मुंबईत कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात 9 गंभीर
By Admin | Updated: April 30, 2017 10:45 IST2017-04-30T08:26:12+5:302017-04-30T10:45:03+5:30
मुंबईत मध्यरात्रीच्या सुमारात दादर- माटुंगा उड्डाणपुलावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे

मुंबईत कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात 9 गंभीर
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - मुंबईत मध्यरात्रीच्या सुमारास दादर- माटुंगा उड्डाणपुलावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या स्कॉर्पिओ कार आणि ट्रकच्या झालेल्या अपघातात आतापर्यंत 9 जण गंभीर स्वरूपात जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती मिळाली आहे. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमीपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचीही प्राथमिक माहिती समजली आहे. मात्र अपघाताचं कारण अद्यापही समजलं नाही, पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी स्कॉर्पिओने भांडुपहून मरिन ड्राइव्हला भरधाव वेगात निघालेल्या 9 मित्रांना ही पार्टी भलतीच महागात पडली आहे. बर्थडे पार्टीच्या जोशात स्कॉर्पिओ चालकाचा गाडीवरचा ताबा सुटून गाडी डिव्हायडरवरून दुसऱ्या लेनवर आली आणि सायनच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकवर आदळून अपघात झाला. या भीषण अपघातात गाडीचा चुराड़ा झाला असून, ट्रक चालकासह 9 जण जखमी झाले आहेत. यापैकी तिघांची प्रकृति चिंताजनक आहे.
माटुंगा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास हा अपघात घडला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना सायन आणि फोर्टिस रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी स्कॉर्पिओ चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्याने बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते तो यात गंभीर जखमी आहे. तर बर्थडे बॉय यातून थोडक्यात बचावला असल्याची माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. एम. काकड यांनी दिली आहे.