शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

आधारकार्डच्या ९४०० छायांकित प्रती जप्त

By admin | Published: January 25, 2017 3:45 AM

बनावट कागदपत्रांच्या आधारे मोबाइलच्या सिम कार्डची विक्री करणाऱ्या सात जणांच्या टोळीला, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या

ठाणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे मोबाइलच्या सिम कार्डची विक्री करणाऱ्या सात जणांच्या टोळीला, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ११ हजार ३४५ सिम कार्ड, ९४०० बनावट आधार कार्डांच्या छायांकित प्रति, कार्यरत नसलेले तीन हजार ३६० सिम कार्ड, दोन संगणक असा लाखो रुपयांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती, ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली.ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मतदारांची बनावट ओळखपत्रांच्या छायांकित प्रति मिळाल्याने, बोगस मतदानासाठी त्याचा उपयोग केला जाणार होता का? या दृष्टीनेही तपास केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आधार कार्ड आणि निवडणूक ओळखपत्रांचे स्कॅनिंग करून, ते संगणकामध्ये अ‍ॅडॉब फोटोशॉप सॉफ्टवेअरद्वारे मूळ कार्डधारकाचा फोटो आणि नाव पत्त्यामध्ये फेरफार करून, त्याच्या छायांकित (झेरॉक्स) प्रति काढून त्या बनावट कागदपत्रांद्वारे वेगवेगळ्या कंपन्यांचे अनेक सिम कार्ड कार्यरत केल्याची माहिती, भिवंडी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळाली होती. त्या आधारे, ९ नोव्हेंबर २०१६ रोजी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यात १० नोव्हेंबर रोजी कलीमुद्दीन खान , संदीपकुमार गुप्ता , अनिल सिंह , बंडू भाकरे आणि गणेश नेलवाडे यांना अटक केली होती. त्यांच्याकडून बोगस नावाने तयार केलेले सिम कार्डसाठीचे अर्ज, बनावट आधार कार्ड आणि मोबाइल दुकानाच्या नावाचे ६० शिक्केही जप्त केले होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड कार्यरत करणारा भिवंडीतील अश्रफी मोबाइलचा मालक सिराज अन्सारी याला ४७० सिम कार्ड ज्ञानप्रकाश गुप्ता यास विक्री करताना पकडले. (प्रतिनिधी)