लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत ९३८ तक्रारी
By Admin | Updated: July 4, 2016 23:26 IST2016-07-04T23:26:07+5:302016-07-04T23:26:07+5:30
फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी लोकशाही दिनात तक्रारी दिल्यानंतरही न्याय न मिळाल्याने अखेर सोमवारी ठेवीदारांनी लोकसेवा हक्क कायद्यांचे अस्त्र उगारले

लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत ९३८ तक्रारी
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 4- जिल्ह्यातील पतसंस्थांमध्ये ठेवी अडकून फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी लोकशाही दिनात तक्रारी दिल्यानंतरही न्याय न मिळाल्याने अखेर सोमवारी ठेवीदारांनी लोकसेवा हक्क कायद्यांचे अस्त्र उगारले आहे. जनसंग्राम संघटनेतर्फे ९३८ ठेवीदारांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. जनसंग्राम ठेवीदार संघटनेतर्फे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार अर्ज देण्यासाठी जिल्ह्यातील ठेवीदारांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सोमवार ४ रोजी सकाळी ११ वाजता ११४ पतसंस्थांच्या ९३८ ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मिळाव्या म्हणून जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे प्रमुख तीन मागण्यांची स्वतंत्र तक्रार दिली. अर्जातील माहितीची पडताळणी करून सर्व तक्रारी मंगळवार ५ रोजी सादर करण्यात येणार आहे. तक्रार अर्ज भरून घेत असताना जिल्हा उपनिबंधक कार्यालय परिसरात जनसंग्राम ठेवीदार संघटनेतर्फे मागणी सभा घेण्यात आली. सभेला जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, साहाय्यक निबंधक अशोक बागल, आर. एस. भोसले, कार्यालय प्रमुख अरुण खैरे, डी. जी. दोरकर उपस्थित होते.