शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

84 वर्षांच्या ‘लखोबा लोखंडे’ला पुण्यातून अटक, ठाण्यातील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून उकळले लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 19:30 IST

लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील वागळे इस्टेट येथील 44 वर्षीय महिलेकडून सुमारे आठ लाख 78 हजार रुपये उकळणा-या 84 वर्षीय शिवचंद्र चिटणीस या भामटयाला ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

ठाणे - लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील वागळे इस्टेट येथील 44 वर्षीय महिलेकडून सुमारे आठ लाख 78 हजार रुपये उकळणा-या 84 वर्षीय शिवचंद्र चिटणीस या भामटयाला ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

पुण्याच्या चिंचवड (मूळ रा. राधाकृष्ण कॉलनी, जळगाव) भागात राहणाºया या भामट्याने ठाण्याच्या शिवाजीनगर भागातील या महिलेला 4 फेब्रुवारी 2016 पासून लग्नाचे आमिष दाखवले. चिटणीस याच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये वास्तव्याला असलेल्या स्वाती राणे (55) या महिलेच्या मदतीने 70 हजारांची रोकड घेतली. तसेच वेगवेगळया कारणांसाठी तिच्या बँक खात्यातूनही तीन लाख 38 हजारांची रक्कम काढली. तिच्या भावाकडूनही चार लाखांची रक्कम घेऊन फसवणूक केली. वारंवार मागणी करूनही चिटणीस पैसे परत करत नाही किंवा लग्नाचेही नाव काढत नसल्याने या भामटयाविरुद्ध तिने अखेर 28 सप्टेंबर 2017 रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील आणि उपनिरीक्षक दिनेश चव्हाण यांच्या पथकाने त्याला पुण्यातून अटक केली आहे. त्याला २० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.लग्न न करता घेतले कोरे धनादेश-आपण 55 वर्षीय असल्याचे भासवून शिवचंद्रने ठाण्यातील या महिलेकडून 17  कोरे धनादेश स्वाक्षरी करून घेतले. त्याने ते स्वाती राणे हिला वेगवेगळया खरेदीसाठी आणि लघुउद्योगासाठी दिले. या धनादेशाद्वारे त्याने तीन लाख 38  हजार 69 रुपयांची खरेदीही केली. तिच्या नातेवाईकांकडूनही प्रत्येकी 70 हजार असे एक लाख 40 हजार तसेच तिच्या भावाकडून चार लाख रुपये घेतले. यातूनच त्याने पवई येथे एका बांधकाम व्यावसायिकाकडे घर खरेदीसाठी 18 लाख 70 हजार रुपये भरल्याची बनावट पावती त्याने तिला दाखविली.यापूर्वीही फसवणुकीचे दोन गुन्हे-पुण्याच्या पिंपरीतील विजय वराडे यांनाही इलेक्ट्रीक रिसर्च सेंटरचे टेंडर काढून देतो, असे सांगून त्यांच्याकडून त्याने दोन लाख रुपये घेतले होते. याप्रकरणीही 13 जुलै 2017 रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.मुंबईच्या वाकोला येथील उज्ज्वला जगदाळे यांच्याकडून शिवचंद्र आणि स्वाती राणे यांनी खारघर येथे घर घेऊन देण्याच्या नावाखाली 26 लाख रुपये उकळले. वाकोला पोलीस ठाण्यात याप्रकरणी 3फेब्रुवारी 2017 रोजी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणेjailतुरुंग