शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वर्षभरात ८२४ लाचखोर जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 04:43 IST

अपसंपदा जमविणारे ४४ भ्रष्ट अधिकारीही उजेडात : नागपूर, पुणे विभाग अव्वल

- नरेश डोंगरेनागपूर : सरकारने लठ्ठ पगार आणि विविध सोयीसवलती उपलब्ध करून दिल्यानंतरही खाबुगिरीसाठी नागरिकांची अडवणूक करणाऱ्या राज्यातील ८२४ लाचखोरांविरुद्ध वर्षभरात कारवाई करण्यात आली. तसेच पदाचा दुरुपयोग करून अपसंपदा जमविणाºया ४४ जणांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हे दाखल केले. अपसंपदा जमविल्याच्या आरोपावरून राज्यात सर्वाधिक १५ गुन्हे नागपूर विभागात दाखल झाली आहेत.आज लाचलुचपत प्रतिबंधक दिन आहे. त्यानिमित्त राज्याचा अढावा घेतला असता सर्वोत्तम कामगिरी पुणे आणि नागपूर विभागाने बजावल्याचे स्पष्ट होते. राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नांदेड अशा ८ ठिकाणी विभागीय कार्यालये आहेत. १ जानेवारीपासून आजपर्यंत सर्व युनिटच्या कामगिरींचा आढावा लक्षात घेता, एसीबीच्या पुणे युनिटने वर्षभरात लाचखोरांना जेरबंद करण्यासाठी १८० सापळे लावले तर, भ्रष्टाचाराचे ४ गुन्हे दाखल केले. नागपूर एसीबी युनिटने ११९ सापळे लावले तर, १५ भ्रष्ट अधिकाºयांविरुद्ध गुन्हे दाखल केले. औरंगाबाद एसीबीने १०८ सापळे आणि ३ गुन्हे, नाशिकने १०२ सापळे आणि ७ गुन्हे, ठाणे ९७ सापळे आणि ४ गुन्हे, अमरावती ९६ सापळे आणि ३ गुन्हे, नांदेड ८३ सापळे आणि २ गुन्हे तसेच मुंबई एसीबी युनिटने ३९ सापळे लावून भ्रष्टाचाराचे ५ गुन्हे दाखल केले.

एसीबीने लावले ८२४ सापळेशासकीय नोकरदारांविरुद्ध एसीबीने ८२४ सापळे लावले. पदाचा दुरुपयोग करून अमाप मालमत्ता जमविणाºया २१ तसेच विविध मार्गाने भ्रष्टाचार करणाºया २३ असे एकूण ४४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागMaharashtraमहाराष्ट्र