शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
4
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
5
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
6
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
7
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
8
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
9
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
10
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
11
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
12
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
13
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
14
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
15
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
16
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
17
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
18
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
19
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
20
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे

खरीपाच्या ८२ टक्के पेरण्या उरकल्या : तूर-मूगाच्या पेरण्यांना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 12:23 PM

खरीपाचे ऊस पीक वगळून सरासरी क्षेत्र १४०.६९ लाख हेक्टर असून, पैकी ११५.७९ लाख हेक्टर क्षेत्रावर २६ जुलै अखेरीस पेरणी आणि लागवडीची कामे उरकली आहेत...

ठळक मुद्दे भात, नाचणी, ज्वारीच्या क्षेत्रात घटीची शक्यतामक्या पाठोपाठ सोयाबीन, भुईमूगावर रोगाचा प्रादुर्भाव

पुणे : राज्यात खरीपाच्या ११५.७९ लाख हेक्टरवरील (८२ टक्के) पेरणी आणि लागवडीची कामे उरकली आहेत. भात, ज्वारी आणि नाचणीची सरासरीच्या निम्मी देखील पेरणी आणि लागवडीची कामे झालेली नाहीत. त्यामुळे यंदा या पिकांच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मराठवाड्यात मूग, तूर आणि उडीदाच्या पेरण्या उशिरा झाल्याने या पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. खरीपाचे ऊस पीक वगळून सरासरी क्षेत्र १४०.६९ लाख हेक्टर असून, पैकी ११५.७९ लाख हेक्टर क्षेत्रावर २६ जुलै अखेरीस पेरणी आणि लागवडीची कामे उरकली आहेत. तर, उसासह सरासरी क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर असून, ११६.४० लाख हेक्टरवर (७८ टक्के) पेरणी-लागवडीची कामे झाली आहेत. राज्यात १ जून ते २६ जुलै दरम्यान सरासरी ५६१ मिलिमीटर पाऊस पडतो. या काळात ४२७.५ मिलिमीटर (७६.२ टक्के) पाऊस झाला. राज्यात ठाणे, पालघर, रायगड, अहमदनगर, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. उर्वरीत राज्यात सरासरीच्या ५० ते ९९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. राज्यात भाताचे सरासरी क्षेत्र १५ लाख ८ हजार २२१ हेक्टर असून, त्या पैकी ५ लाख ८० हजार ८५१ (३९ टक्के) हेक्टरवरील लागवडीची कामे झाली आहेत. कोकणात ७० आणि कोल्हापूरात ७९ टक्के क्षेत्रावर भात लागवडीची कामे झाली आहेत. पुणे जिल्ह्यात भाताचे सरासरी क्षेत्र ६९ हजार ९७४ हेक्टर असून, त्या पैकी ३० हजार ४७६ हेक्टर (४४ टक्के) क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. कोकण, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर या विभागात नाचणीचे सरासरी क्षेत्र १० लाख ९ हजार हेक्टर आहे. त्या पैकी ३९ हजार १३३ हेक्टरवर (३६ टक्के) लागवड झाली. खरीप ज्वारीचे ७ लाख १९ हजार ३७७ हेक्टर क्षेत्र असून, २ लाख ४३ हजार ३०० हेक्टरवर (३४ टक्के) पेरणी झाली आहे. ---------मक्या पाठोपाठ सोयाबीन, भुईमूगावर रोगाचा प्रादुर्भावकोल्हापूर विभागात काही ठिकाणी मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. पाठोपाठ भुईमूगावर पाने खाणाºया आणि सोयाबीनवर पाने खाणाºया व पाने गुंडाळणाºया अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. औरंगाबाद विभागात मक्यावर अमेरिकन लष्करी अळी आणि कापसावर रस शोषणाºया किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊसagricultureशेती