शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चिंता वाढली; काेराेनाच्या नव्या स्ट्रेनचे राज्यात 8 रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 06:50 IST

Corona New Strain: दक्षतेचे आदेश; मुंबईचे पाच, तर पुणे, ठाणे, भाईंदर येथील प्रत्येकी एक

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होत असताना ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांपैकी आठ जणांमध्ये नव्या स्ट्रेनचे विषाणू सापडले आहेत. मुंबईत हॉस्पिटलमध्ये हे सर्व रुग्ण दाखल आहेत. यातील पाच रुग्ण मुंबईचे तर पुणे, मीरा-भाईंदर आणि ठाण्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना विचारले असता ते म्हणाले, ज्या गतीने ब्रिटनमधून येणारी विमाने थांबविण्यात आली व आलेल्या विमानातील सर्व प्रवाशांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले, त्यामुळे ही साथ आपण रोखू शकलो आहोत.  जर आपण परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय वेळीच घेतला नसता, तर महाराष्ट्रात दुसरी लाट भयंकर झाली असती.  दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा येथे बैठक घेऊन लसीकरणासंदर्भात आढावा घेतला. ब्रिटनहून आलेल्या आठ प्रवाशांना नव्या विषाणूची लागण झालेली आहे. त्याबाबत आरोग्य विभाग व मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा केली व अधिक दक्षता ठेवण्याचे निर्देश दिले. 

‘दुष्परिणाम झाल्यास उपचाराची तयारी ठेवा’उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शनासाठी टास्क फोर्ससारखी यंत्रणा तयार करावी. लसीकरणानंतर त्याचे काही दुष्परिणाम झाल्यास त्यावरील उपचाराची पूर्वतयारीठेवा. आरोग्य संस्थांमध्येचलसीकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले.  वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यानी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी लसीकरणाच्या तयारीचे सादरीकरण करण्यात आले.

संपर्कात आलेल्यांचा कसून शाेध सुरूn नव्या कोरोना विषाणूची लागण झालेले आठही प्रवासी सध्या संस्थात्मक विलगीकरणात असून, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. n त्यांचा संपर्क कुणाकुणाशी आला, ते काटेकोरपणे शोधण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी  बैठकीत दिली. n तर नव्या स्ट्रेनचे सर्व रुग्ण ज्यांच्या संपर्कात आले होते, त्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र त्यांना नवीन स्ट्रेन आढळलेला नाही. तरीदेखील त्यांना अद्याप घरी सोडण्यात आलेले नाही, असेही मनपा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

कोविशिल्डचा डोस सरकारला २०० रुपयांतअ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्डने विकसित केलेल्या कोविशिल्ड या लसीच्या प्रत्येक डोसची किंमत केंद्र सरकारसाठी २०० रुपये व खुल्या बाजारपेठेतील विक्रीसाठी हजार रुपये अशी निश्चित केल्याचे ‘सीरम’चे अदर पूनावाला यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे