शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

राज्यात मंगळवारी ७१ हजार ९६६ रुग्ण कोरोनामुक्त, मुंबईत आढळले कोरोनाचे एक हजार ७१७ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 07:45 IST

मुंबईत सध्या ४१ हजार १०२ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १७० दिवसांवर येऊन ठेपला आहे.

 

मुंबई : मुंबईत दैनंदिन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत असल्याचे दिसून आले आहे. मुंबईत मागील चोवीस तासांत अवघे एक हजार ७१७ रुग्णांचे निदान झाले असून, ५१ मृत्यूंची नोंद झाली आहे तर त्या तुलनेत मंगळवारी बरे झालेल्या संख्या अधिक असून, तब्बल सहा हजार ८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहर उपनगरात आतापर्यंत एकूण सहा लाख २३ हजार ८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.मुंबईत सध्या ४१ हजार १०२ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १७० दिवसांवर येऊन ठेपला आहे. ४ ते १० मे या कालावधीत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.३९ टक्के असल्याची नोंद आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची एकूण संख्या सहा लाख ७९ हजार ९८६ असून, बळींचा आकडा १३ हजार ९४२ इतका आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी दिवसभरात २८ हजार २५८ चाचण्या करण्यात आल्या, तर आतापर्यंत एकूण ५७ लाख ६१ हजार ६८९ कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

आतापर्यंत राज्यात १ कोटी ८४ लाखांहून अधिक जणांना लसराज्यात सोमवारी २ लाख ९४ हजार ७६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण १ कोटी ८४ लाख ७ हजार ४६५ जणांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.- राज्यात आतापर्यंत मुंबईत सर्वाधिक २७ लाख ८२ हजार ६४७ जणांचे लसीकरण करण्यात आले. त्याखालोखाल, पुण्यात २४ लाख ८७ हजार ६४४, नागपूर ११ लाख १९ हजार ८१२ , ठाणे १४ लाख २३ हजार ४००, तर नाशिकमध्ये ८ लाख ३४ हजार ८१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

राज्यात दिवसभरात ७१ हजार ९६६ रुग्ण कोरोनामुक्तराज्यात मागील २४ तासांत रुग्ण निदानाच्या तुलनेत रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. राज्यात दिवसभरात ७१ हजार ९६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत ४५ लाख ४१ हजार ३९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार ९६६ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.राज्यात दिवसभरात ४० हजार ९५६ रुग्ण आणि ७९३ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५१ लाख ७९ हजार ९२९ झाली असून बळींचा आकडा ७७ हजार १९१ आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.६७ टक्के असून मृत्युदर १.४९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९८ लाख ४८ हजार ७९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.३५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३५ लाख ९१ हजार ७८३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २९ हजार ९५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.दिवसभरात नोंद झालेल्या ७९३ मृत्यूंपैकी ४०३ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर १७० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २२० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र