शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अनिकेत कोथळे हत्येप्रकरणी आणखी ७ पोलीस कर्मचारी निलंबित, एकुण 12 पोलिसांचं निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 13:00 IST

अनिकेत कोथळे हत्येप्रकरणी सांगली शहर पोलिसातील आणखी ७ जणांना निलंबित करण्यात आलं आहे.

ठळक मुद्देअनिकेत कोथळे हत्येप्रकरणी सांगली शहर पोलिसातील आणखी ७ जणांना निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची संख्या आता 12 झाली आहे.

सांगली- अनिकेत कोथळे हत्येप्रकरणी सांगली शहर पोलिसातील आणखी ७ जणांना निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची संख्या आता 12 झाली आहे. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह 5 जणांना कोर्टाने याआधीच यापूर्वीच पोलीस कोठडी सुनावली आहे. निलंबित 7 पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये ठाणे अमंलदार, नाईट शिफ्टचे चार गार्ड्स, वायरलेस ऑपरेटर आणि त्यांच्या मदतनिसाचा समावेश आहे. पोलीस ठाण्यात कोथळेच्या मृत्यूप्रकरणी दुर्लक्ष केल्याने त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपी अनिकेत कोथळेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात घडली होती. या प्रकरणात अनिकेत पोलीस कोठडीतून पळाल्याचा बनाव पोलिसांनी रचला होता. पण चौकशीनंतर अनिकेतचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी अनिकेतचा मृतदेह आंबा घाटात नेऊन जाळल्याचंही समोर आलं. 

कोल्हापूर रस्त्यावर एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारी या दोघांना अटक केली होती. आरोपींना चौकशीसाठी डिटेक्शन ब्रँचमध्ये नेत असताना त्यांनी पळ कढल्याचा बनाव पोलिसांनी केला होता. पण चौकशी दरम्यान तो बनाव उघड झाला.दरम्यान, गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी प्रकरणातील कोणाचीही गय केली जाणार नसल्याचं म्हंटलं आहे.  या घटनेला जबाबदार असेलेल्या बारा पोलीसांवर कारवाई केली आहे.आणखी कोण दोषी असतील तर त्याच्यावर ही कारवाई करण्यात येईल या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी सहभागी असले तरी त्याची गय केली जाणार नाही .पोलीस अधीक्षकांची या प्रकरणातील भूमिका तपासली जाईल, असं राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी लोकमतशी बोलताना म्हंटलं. 

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे