शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

32 लाखांचं बक्षीस असलेल्या सात जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 19:34 IST

तीन महिला व चार पुरूषांचा समावेश

गडचिरोली : नक्षल चळवळीला कंटाळून सात जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये चार पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे. या सातही जणांवर एकूण ३१ लाख ५० हजार रूपयांचे बक्षीस होते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे. विकास ऊर्फ साधू पोदाळी (२७), वैशाली बाबुराव वेलादी (१८), सूरज ऊर्फ आकाश ऊर्फ धनातू तानू हुर्रा (२५), मोहन ऊर्फ दुलसा केसा कोवसी (१९), नवीन ऊर्फ अशोक पेका (२५), जन्नी ऊर्फ कविता हेवडा धुर्वा (२६), रत्तो ऊर्फ जनीला ऊर्फ दुर्गी गेबा पुंगाटी (२९) अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. विकास पोदाळी हा फेब्रुवारी २०१३ मध्ये बिनागुंडा सीएनएम टीममध्ये सहभागी झाला. तो मार्च २०१४ पासून छत्तीसगड राज्यातील कोडेलयेर येथे जनमिलिशिया दलम सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे तीन गुन्हे दाखल आहेत. शासनाने त्याच्यावर चार लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. वैशाली वेलादी ही जानेवारी २०१५ मध्ये राही दलममध्ये सहभागी झाली. ऑगस्ट २०१८ मध्ये भामरागड दलममध्ये ती कार्यरत होती. तिच्यावर ४ लाख ५० हजार रूपयांचे बक्षीस होते. सूरज हुर्रा हा फेब्रुवारी २०१० मध्ये टिपागड दलममध्ये सर्वप्रथम सहभागी झाला. एप्रिल २०११ ते एप्रिल २०१३ पर्यंत धानोरा दलममध्ये कार्यरत होता. मे २०१३ मध्ये पुन्हा टिपागड दलममध्ये त्याला सहभागी करून घेण्यात आले. त्याचवर्षी त्याला पीपीसीएम म्हणून पदोन्नती देण्यात आली. तो जानेवारी २०१७ पर्यंत कसनसूर अ‍ॅक्शन टीममध्ये कार्यरत होता. त्याच्यावर १३ चकमक, पाच खून, तीन भूसुरूंग स्फोट आणि एक जाळपोळ असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर ४ लाख ५० हजार रूपयांचे बक्षीस होते. मोहन कोवसी हा जून २०१५ मध्ये पेरमिली दलममध्ये सहभागी झाला. ऑगस्ट २०१५ मध्ये त्याची पेरमिली दलममधून सिरोंचा दलममध्ये बदली झाली. फेब्रुवारी २०१७ पर्यंत तो सिरोंचा दलम डीव्हीसी रघू याचा गार्ड म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर दोन चकमक व एक खूनाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर ४ लाख ५० हजार रूपयांचे बक्षीस होते. नवीन टेका हा फेब्रुवारी २०१२ मध्ये गट्टा दलममध्ये भरती झाला. एप्रिल २०१२ मध्ये त्याची सिरोंचा दलममध्ये बदली झाली. २०१४ पर्यंत तो सिरोंचा दलममध्ये डीव्हीसी श्रीनू याचा अंगरक्षक म्हणून कार्यरत होता. २०१५ मध्ये त्याला उपकमांडर पदावर पदोन्नती देण्यात आली. तो २०१७ पर्यंत गट्टा दलम उपकमांडर म्हणून कार्यरत होता. एप्रिल २०१७ मध्ये पेरमिली दलममधून पुन्हा गट्टा दलममध्ये त्याची बदली झाली. त्याच्यावर पाच चकमक, दोन हमले, एक स्फोट, सहा खून, एक अपहरण, दोन जाळपोळ असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर ४ लाख ५० हजार रूपयांचे बक्षीस होते. जन्नी धुर्वा ही जून २०१० मध्ये भामरागड दलममध्ये सहभागी झाली. डिसेंबर २०१० मध्ये तिला सेक्शन कमांडर म्हणून पदोन्नती देण्यात आली. तिच्यावर सात चकमक, दोन जाळपोळ, तीन खून, एक भूसुरूंग स्फोट असे गुन्हे आहेत. शासनाने पाच लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सत्तो पुंगाटी ही ऑक्टोबर २०१७ मध्ये भामरागड दलममध्ये सहभागी झाली. डिसेंबर २०१८ पर्यंत ती टिपागड दलममध्ये एसीएएम पदावर कार्यरत होती. तिच्यावर पाच लाख रूपयांचे बक्षीस होते. सात नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, डॉ.हरी बालाजी, डॉ.मोहित गर्ग उपस्थित होते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली