हत्ती हल्ल्यात ७ मृत,१५ जखमी

By Admin | Updated: November 22, 2014 00:15 IST2014-11-21T22:44:12+5:302014-11-22T00:15:55+5:30

दहा वर्षातील स्थिती : नुकसानीची ८ हजार प्रकरणे दाखल, भरपाईपोटी पावणेदहा कोटींचे वाटप

7 dead, 15 injured in elephant attack | हत्ती हल्ल्यात ७ मृत,१५ जखमी

हत्ती हल्ल्यात ७ मृत,१५ जखमी

अनंत जाधव -सावंतवाडी --सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तींनी गेल्या दहा वर्षात, म्हणजेच सन २००४ पासून आजपर्यंत सात जणांचे बळी घेतले आहेत, तर १५ जणांना जखमी केले आहे. हत्ती नुकसानग्रस्तांची ७,९०६ प्रकरणे वनविभागाला प्राप्त झाली असून, नुकसान भरपाईपोटी पावणेदहा कोटी रुपये रक्क्कम अदा करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात तीन हत्तींचे वास्तव्य आहे. त्यापैकी एक कुडाळ तालुक्यात, तर दोन हत्ती कणकवली तालुक्यात असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
सन २००२ ते ०३ च्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्नाटक राज्यातून सहा हत्तींचा कळप तिलारी परिसरात दाखल झाला होता. त्यानंतर गेल्या दहा वर्षात या हत्तींनी अर्ध्याअधिक जिल्ह्यात आपले साम्राज्य पसरवले असून प्रत्येक तालुक्यात नुकसानी करत हत्तींचा कळप पुढेच्या ठिकाणी जातो. सध्या हत्तींनी आपला मोर्चा कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे व कणकवली तालुक्यातील डामरे-सावडाव भागात वळवला आहे. या ठिकाणी हत्तींनी भातशेती व केळीबागायतीचे प्रचंड नुकसान केले आहे. आतापर्यंत या हत्तीना परतविण्यासाठी वनविभागाने नवनवीन उपाय केले, मोहिमा राबवल्या. पण हे सर्व उपाय अपुरे पडले असून हत्तीनी एक प्रकारे वनविभागावर विजयच मिळवला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्ती दाखल झाल्यानंतर या हत्तीनी दोडामार्गमधुन नुकसान सत्रास सुरूवात केली. तर पहिला बळी शिरंगे येथील शंकर बाळा गावडे यांचा १० एप्रिल २००४ मध्ये घेतला. तेव्हापासून हत्ती हल्ल्यात मृत झालेल्यांची संख्या ७ जुलै २००७ पर्यंत ७ वर जाऊन पोहोचली आहे. तर जखमीची संख्या १५ च्या घरात जाऊन पोहोचली आहे. यामध्ये बुधवारी हत्ती हल्ल्यात जखमी झालेल्या वेताळबांबर्डे येथील वैभव गायकवाड याचाही समावेश आहे.
हत्तीपासून बागायतीचे झालेल्या नुकसानीची आकडेवारी कोटीच्या घरात जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत वनविभागाकडे नुकसानीची ७,९०६ प्रकरणे दाखल झाली आहेत. त्याप्रमाणे वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रक्कम अदा केली असून, ही रक्कम ९ कोटी ६९ लाख ५८ हजार रुपये एवढी आहे. सध्या हत्तींकडून नुकसानसत्र सुरूच असून यात वाढ होण्याची शक्यताही वनविभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, हत्तींच्या वावराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता सध्या त्रस्त झाली आहे.


हत्ती हल्ल्यात नुकसानीची प्रकरणे व अदा रक्कम
वर्षप्रकरणेअदा रक्कम (रुपये)
२००६-०७८४३१ कोटी ४३ लाख
२००७-०८१५१०१ कोटी ५० लाख
२००८-०९१४७७२ कोटी ६ हजार
२००९-१०२८८७ लाख ६२ हजार
२०१०-१११०२३१ कोटी २७ लाख
२०११-१२५९९६४ लाख ४७ हजार
२०१२-१३८७७१ कोटी १२ लाख ४३ हजार
२०१३- १४८७७१ कोटी १२ लाख
२०१४-१५५८१ ८३ लाख ३३ हजार


हत्ती प्रश्न ठरतोय डोकेदुखी
अपुरा कर्मचारी वर्ग, त्यात हत्ती बंदोबस्तासाठी दररोज कर्मचाऱ्यांची एक तुकडी जंगलात पाठवावी लागते त्यामुळे वनविभागापुढे अनेक प्रश्न निर्माण झाला आहे.
हत्तींनी कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. नुकसान भरपाईपेक्षा मोहीम राबविली असती तर बरे झाले असते.
पण ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय...’ अशीच काहीशी अवस्था वनविभागाची झाली आहे.

हत्ती हल्ल्यातील मृत व्यक्ती
नावतालुकादिनांक
शंकर गावडेदोडामार्ग१० एप्रिल २००४
अशोक कुंभारकुडाळ ३० नोव्हेंबर २००६
कृष्णा कदमकुडाळ१२ डिसेंबर २००७
केशव उपरकरसावंतवाडी१८ आॅगस्ट २००८
सीताराम परबकुडाळ१० एप्रिल २०१४
मोहन सडवेलकरकुडाळ१८ एप्रिल २०१४
बाबू धुळू बुटेकुडाळ०७ जुलै २०१४


हत्ती हल्ल्यातील जखमी
चंद्रशेखर सावंत, रा. बांदा३१ जानेवारी २००६
सहदेव चांदेरकर, रा. आरोसबाग०२ मार्च २००६
रवींद्र जळवी, रा. पिंगुळी३१ मार्च२००७
पांडुरंग कुडतरकर, रा. भडगाव२९ एप्रिल २००७
हेमंत धोंड, रा. वायगंणी ०३ एप्रिल २००७
बाबाजी तारी, रा.ओटवणे १८ फेब्रुवारी २००८
विनायक कवठणकर, रा. शिरोडा२० सप्टेंबर २००९
सुनिल कावळे, रा. आरवली२० सप्टेंबर २००९
विलास येंडगे, रा. निळेली २० डिसेंबर २००९
घन:श्याम बळीराम लाड, रा. निवजे १८ नोव्हेंबर २०११
बेनीत जॉकी डिसोजा, रा. निवजे १८ नोव्हेंबर २०११
बाबूराव शिगार्डे, रा. निवजे २८ नोव्हेंबर २०१२
विजया जाधव, रा. कसाल ०४ जून २०१४
वैभव गायकवाड, रा. वेताळबांबर्डे १२ नोव्हेंबर २०१४

Web Title: 7 dead, 15 injured in elephant attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.