६९ हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर

By Admin | Updated: June 27, 2015 02:07 IST2015-06-27T02:07:14+5:302015-06-27T02:07:14+5:30

अकरावी आॅनलाईन प्रवेशासाठी गुरूवारी सायंकाळी उशीरापर्यंत झालेल्या प्रवेश नोंदणीत एकूण १ लाख

69 thousand students out of the admission process | ६९ हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर

६९ हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर

मुंबई : अकरावी आॅनलाईन प्रवेशासाठी गुरूवारी
सायंकाळी उशीरापर्यंत झालेल्या प्रवेश नोंदणीत एकूण १ लाख
१८ हजार ६३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्याचे मुंबई
शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले आहे. त्यामुळे पहिल्या कट आॅफनंतर ६९ हजार ५२७ विद्यार्थी आॅनलाईन प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत.
पहिल्या यादीत ५० हजार
८८८ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले होते. तर १२
हजार ४९१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले नव्हते. मात्र ६९ हजार ५२७
विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून
बाहेर पडल्यानंतर बेटरमेंट पर्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या
सर्वच विद्यार्थ्यांच्या आशा बळावल्या आहेत. तरी आॅनलाईनची दुसरी
कट आॅफ लिस्ट ३० जून रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे.

Web Title: 69 thousand students out of the admission process