नुकसान भरपाईचे ६४ लाख बेस्टकडे

By Admin | Updated: August 26, 2016 06:54 IST2016-08-26T06:54:30+5:302016-08-26T06:54:30+5:30

६४ लाख ७३ हजार २२८ रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे बेस्टला दिलेले आदेश मागे घेत मोटार अपघात लवादाने बेस्टला क्लीन चीट दिली.

64 million best of compensation | नुकसान भरपाईचे ६४ लाख बेस्टकडे

नुकसान भरपाईचे ६४ लाख बेस्टकडे


मुंबई : अपघात केल्याचा आरोप असल्याने त्याला ६४ लाख ७३ हजार २२८ रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे बेस्टला दिलेले आदेश मागे घेत मोटार अपघात लवादाने बेस्टला क्लीन चीट दिली. मुर्जी पटेल यांना बाईकरून जात असताना बेस्टच्या चालकाने बाईकला मागून जोरदार धडक दिली. शुद्धीवर येण्यासाठी पटेल यांना सहा महिने लागले. त्यांच्या उपचारापोटी मोटार अपघात लवादाने बेस्टला पटेल यांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. मात्र लवादाने आपल्याला दोन साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याची परवानगी न देऊन नैसर्गिक न्यायदान तत्वाचे उल्लंघन केले. त्यामुळे त्या दोन साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याची परवानगी मिळावी, यासाठी बेस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने हे प्रकरण लवादाकडे वर्ग केले. बेस्टतर्फे अ‍ॅड. करिश्मा झवेरी यांनी या दोघा साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यांनी बेस्टचा नंबर पाहिले नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे लवादाने बेस्टला क्लीनचीट दिली (प्रतिनिधी)

Web Title: 64 million best of compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.