शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ६४ लाख विद्यार्थी आधारपासून 'निराधार'; शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 10:54 IST

१ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्यावतीकरणाचे काम ३१ मार्च २०२१ पर्यंत शाळा व्यवस्थापनाने करायचे आहे.

ठळक मुद्दे६४,५९,३८८ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीमध्ये नोंदविणे प्रलंबित असल्याची स्थिती आधार नोंदणीची व्यवस्था शाळा, बँक, पोस्ट ऑफिसमध्ये करावी

पिंपरी : राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्यावतीकरण ३१ मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत राज्यातील १,१०,३१५ शाळांमध्ये २,२५,६०,५७८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सद्य:स्थितीत ६४,५९,३८८ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीमध्ये नोंदविणे प्रलंबित असल्याची स्थिती आहे.

शालेय पोषण आहार योजना, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना, मोफत गणवेश योजना, मोफत पाठ्यपुस्तक योजना या योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येतो. या योजनांचा लाभ घेण्यास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सरल संकेतस्थळावर उपलब्ध असावी. संबंधितांना लाभाचे दुबार प्रदान रोखण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक शिक्षण विभागाच्या सरल प्रणालीमध्ये नोंद होणे आवश्यक आहे. काही विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी म्हणजेच एकच आधार; पण २ नावांचे वेगळे विद्यार्थी दाखविल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर काही अस्तित्वात नसलेले आधार क्रमांक नोंदणी झाल्याचे प्रकार समोर आले होते. या सर्व बाबींवर आळा घालण्यासाठी सर्व विद्यार्थी आधार क्रमांक नोंदवून त्याची खात्री होणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने आधार नोंदणी आणि अद्यावतीकरण आवश्यक केले आहे.

आधार कार्ड असलेल्या; परंतु चालू शैक्षणिक वर्षामध्ये (२०२०-२१) वयाची ५ अथवा १५ वर्षे पूर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आधार नोंदणीमध्ये बायोमेट्रिक अपडेटद्वारे दुरुस्ती करणे आवश्यक असणार आहे.

१ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्यावतीकरणाचे काम ३१ मार्च २०२१ पर्यंत शाळा व्यवस्थापनाने करायचे आहे. शाळा व्यवस्थापनांनी पालकांना मार्गदर्शन करून, सर्व विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करून घ्यावी. आधार नोंदणी करताना अनुदानित शाळांना प्राधान्य देण्यात यावे. आधार नोंदणीची व्यवस्था शाळा, बँक, पोस्ट ऑफिसमध्ये करावी. ही पूर्ण कार्यवाही ३१ मार्च अखेरपूर्ण करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. आधार नोंदणी आणि अद्यावतीकरण कामाचे नियोजन करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या नियंत्रणाखाली संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांची राहणार आहे. या संदर्भात राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळाStudentविद्यार्थीAdhar Cardआधार कार्डEducationशिक्षण