६२ जणांनी थकविले संरक्षण शुल्क
By Admin | Updated: March 16, 2016 08:36 IST2016-03-16T08:36:57+5:302016-03-16T08:36:57+5:30
सुप्रसिद्ध उद्योगपती नेस वाडिया, नसली वाडिया, निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर, माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्यासह ६२ जणांनी ५ कोटी ६४ लाख ८६ हजार

६२ जणांनी थकविले संरक्षण शुल्क
मुंबई : सुप्रसिद्ध उद्योगपती नेस वाडिया, नसली वाडिया, निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर, माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्यासह ६२ जणांनी ५ कोटी ६४ लाख ८६ हजार रुपये इतके पोलीस संरक्षण शुल्क थकविले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
संजय पोतनीस, सुनील शिंदे, राज पुरोहित आदी सदस्यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पोलीस संरक्षण देण्याच्या मोबदल्यात हे शुल्क आकारले जाते. त्याची वसुली संबंधितांकडून करण्याबाबत मुंबई शहर आणि उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी कळविण्यात आले असून त्याबाबतचा पाठपुरावा सुरू आहे. यात काही दिवंगतांचाही समावेश आहे.
यांनी थकविली रक्कम
विकास कीर्तिकुमार ड्रेसवाला, मोहम्मद फरीद शेख, नंदकुमार नाईक, प्रमोद अप्पा पाटील, कैलास अगरवाल, प्रसाद लाड, अरविंद शहा, युसुफ काँट्रॅक्टर, सुनील मंत्री, नासीर जमाल शेख, बोमन इराणी, जेह वाडिया, नेस वाडिया, नसली वाडिया, तरबेज शेख, हुमायु शफी अहमद शेख, राजेश जैन, राजीव पाठक, तरजितसिंह सहानी, जगदीपससिंह सहानी, अजय गोन्सालिया, मुकुंद पाठक, प्रकाशचंद्र सेनगर, एस.दयाकर रेड्डी, कलिमुद्दीन शरीफ, मिलिंद निखारगे, शरद एस. पवार (माजी नगरसेवक), मधू संघवी, राजेंद्र वाणी, इरफान खत्री, एन.व्ही. बालगिरी, शरद शहा,
विजय कांबळे, मोहम्मद अन्वर
शेख, अली मोरानी, मोहम्मद मोरापनी, करीम मोरानी, बी.आर. शेट्टी,
अनिल शहा, जितेंद्र रमेश जैन, रियाज सिराज भाटी, मणुला काचवाला, मोहम्मद अन्सारी, निखिल अडवाणी, कृपाशंकर सिंह, किशनकुमार, अभिजित राणे, इम्तियाज खत्री, अनिलकुमार सिंह, बोनी कपूर, मेहुल चौक्षी, सोनू सूद, सलिम अली शेख, समीर तन्ना, धर्मेश वोरा, हाजी अराफत शेख, इम्रान लतीफ शेख, मोहम्मद इद्रिस शेख, मोहसीन सलीम चुनावाला, मोहम्मद अताऊल्ला अन्सारी, वीरेंद्र शहा, शहा नवान दरवेश. (विशेष प्रतिनिधी)