शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

धरणांमध्ये अवघा ६० टक्के पाणीसाठा, मराठवाड्यावर जलसंकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 03:53 IST

राज्यात गतवर्षापेक्षा १५ टक्के कमी म्हणजे अवघा ६०.९१ टक्के पाणीसाठा असून तो सुमारे आठ महिने पुरवावा लागणार आहे.

पुणे : राज्यात गतवर्षापेक्षा १५ टक्के कमी म्हणजे अवघा ६०.९१ टक्के पाणीसाठा असून तो सुमारे आठ महिने पुरवावा लागणार आहे. त्यावरच पिण्यासाठी, शेती व उद्योगाची गरज भागविण्याचे आव्हान प्रशासनावर असणार आहे. मराठवाड्यात तर केवळ २३.७५ टक्के साठा असल्याने आवर्षणाचे संकट गडद बनले आहे.राज्यातील ३ हजार २६६ लहानमोठ्या धरणांची ४८ हजार ६३० दशलक्ष घनमीटर पाण्याची क्षमता असून, उपयुक्त पाणीसाठा ४०हजार ८२८ दशलक्ष घनमीटर आहे. यंदा २६ आॅक्टोबर अखेरीस धरणांमध्ये अवघा २४ हजार ८७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे आणि कोकण विभागात तुलनेने पावसाची स्थिती अधिक चांगली आहे. मराठवाड्याची उपयुक्त पाण्याची क्षमता ७ हजार ३७४ दशलक्ष घनमीटर असून, सध्या १ हजार ७५१ दशलक्ष घनमीटर (३२.७५ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी पाणीसाठ्याचे प्रमाण ७० टक्के होते. नाशिकची क्षमता ५ हजार ९३४ दशलक्ष घनमीटर असून, ३ हजार ७९९ (६४ टक्के), तर नागपूर विभागाच्या ४ हजार ६०७ दशलक्ष घनमीटर क्षमतेपैकी १ हजार ७४३ दशलक्ष घनमीटर (३७.८४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिकमध्ये गेल्यावर्षी ८४.२८ आणि नागपूरमध्ये ४२.२१ टक्के पाणीसाठा होता.>राज्यातील प्रमुख धरणांची स्थितीधरण उपयुक्त साठा जलसाठ्याची गेल्यावर्षीची(दशलक्ष घनमीटर) टक्केवारी टक्केवारीतिल्लारी-सिंधुदूर्ग ३८६ ८६.२१ ९५.३२गोसीखुर्द-भंडारा ३७५ ५०.६६ २०.३८तातलाडोह-नागपूर १५० १४.७५ ३३.९७निम्न वर्धा ५७ २६.२८ ५८.८२भंडारदरा-अहमदनगर २४९ ८१.८३ १००मुळा-अहमदनगर ४१५ ६८.२२ १००गिरणा-नाशिक २४६ ४६.९४ ७१.७७दूधगंगा-कोल्हापूर ६४० ९४.२४ १००राधानगरी-कोल्हापूर २०५ ९३.१८ ९४.४२डिंभे-पुणे ३२२ ९१ १००पवना-पुणे २१७ ७९ ८७.८९पानशेत २८५ ९४.५४ १००भाटघर ६५७ ९८.७७ १००वरसगाव ३५९ ९८.९७ १००कोयना २४२० ८५.३६ ९९.१६उजनी १३८३ ९१.१८ १००

टॅग्स :Damधरण