नक्षलवाद्यांना आणखी एक हादरा; गडचिरोलीतील चकमकीत 6 नक्षलवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 23:45 IST2018-04-23T23:41:25+5:302018-04-23T23:45:10+5:30
कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये नक्षल दलम कमांडर नंदू उर्फ वासुदेव आत्राम याचाही समावेश आहे.

नक्षलवाद्यांना आणखी एक हादरा; गडचिरोलीतील चकमकीत 6 नक्षलवादी ठार
गडचिरोली - जिल्ह्यात पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी केलेल्या आक्रमक कारवाईत सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये नक्षल दलम कमांडर नंदू उर्फ वासुदेव आत्राम याचाही समावेश आहे. भारतीय सुरक्षा दल आणि पोलिसांसाठी हे मोठे यश मानले जात आहे.
अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला परिसरात असलेल्या कपेवंचा जंगलात संध्याकाळी ही चकमक झाली. सहा मृतदेह हाती लागताच त्यांची ओळख पटविण्यासाठी ते अहेरी येथील पोलीस उपमुख्यालयात आणण्यात आले. रात्री उशीरापर्यंत हे अभियान सुरू होते. रविवारी भामरागड तालुक्यात छत्तीसगड सीमेलगतच्या जंगलात 16 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा 6 जण ठार झाल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.