रोज ६ लाख तिकिटांचे आरक्षण

By Admin | Updated: July 5, 2014 04:34 IST2014-07-05T04:34:57+5:302014-07-05T04:34:57+5:30

रेल्वेचे तिकीट आरक्षण मिळवताना अवघ्या काही मिनिटांतच प्रवाशांना वेटिंग लिस्टला सामोरे जावे लागते.

6 lakh tickets per day | रोज ६ लाख तिकिटांचे आरक्षण

रोज ६ लाख तिकिटांचे आरक्षण

मुंबई : रेल्वेचे तिकीट आरक्षण मिळवताना अवघ्या काही मिनिटांतच प्रवाशांना वेटिंग लिस्टला सामोरे जावे लागते. त्यामुळे आरक्षणाची क्षमता वाढवण्यावर आयआरसीटीसीकडून (इंडियन रेल्वे कॅटेरिंग टूरिझम कॉर्पोरेशन) तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून यावर नुसतीच चर्चा सुरू असून, यापुढेही प्रवाशांना वेटिंग लिस्टलाच सामोरे जावे लागणार आहे. देशभरात प्रत्येक दिवसाला सहा लाख तिकिटांचे आरक्षण होत आहे. भविष्यात याची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत.
तिकीट मिळवण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने आणि त्यामुळे एकच गोंधळ उडत असल्याने रेल्वेकडून आयआरसीटीसीमार्फत आॅनलाइन तिकीट आरक्षण सुविधा सुरू करण्यात आली. तिकिटांचे आरक्षण करणे तसेच ते रद्द करण्याचे काम या वेबसाइटवरून केले जाऊ शकते. ही वेबसाइट सुरू होताच त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. मात्र हा प्रतिसाद एवढा वाढला की वेबसाइटवर ताण पडू लागल्याचे खुद्द आयआरसीटीसीकडूनच सांगण्यात येते. २0१२ मध्ये देशभरात प्रत्येक दिवशी ३ लाख ६५ हजार तिकिटांचे आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून आरक्षण होत होते. आता या आरक्षणाची संख्या वाढलेली असल्याचे सांगण्यात आले. २0१३ अखेरपर्यंत हीच संख्या साडेपाच लाख एवढी झाली. त्यानंतर २0१४ च्या मे महिन्यापर्यंत संख्या आणखी वाढून ती सहा लाखांपर्यंत गेल्याचे आयआरसीटीसीचे व्यवस्थापक पिनाकीन मोरावाला यांनी सांगितले. सर्वांनाच आरक्षण मिळावे यासाठी आयआरसीटीसीकडून सहा महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले गेले. वेबसाइटवरील आरक्षणाची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करतानाच सॉफ्टवेअरमध्ये काही बदल करता येऊ शकतात का, या दृष्टीने आयआरसीटीसीकडून पाऊल उचलण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: 6 lakh tickets per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.