बस-ट्रक धडकेत ६ ठार

By Admin | Updated: January 12, 2016 03:13 IST2016-01-12T03:13:10+5:302016-01-12T03:13:10+5:30

गुजरातमधील थवा गावाजवळ एसटी बस आणि ट्रक यांच्यात रविवारी रात्री टक्कर होऊन या अपघातात सहा जण जागीच ठार तर नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसचालक विशाल

6 killed in bus-truck crash | बस-ट्रक धडकेत ६ ठार

बस-ट्रक धडकेत ६ ठार

धुळे : गुजरातमधील थवा गावाजवळ एसटी बस आणि ट्रक यांच्यात रविवारी रात्री टक्कर होऊन या अपघातात सहा जण जागीच ठार तर नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसचालक विशाल निकम याच्यासह खान्देशातील तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे.
शिरपूर आगाराची ही बस बडोद्याकडे जात होती. रविवारी रात्री ११च्या सुमारास समोरून येणाऱ्या ट्रकने तिला जबर धडक दिली. विशाल विश्वासराव निकम (रा.बोराडी, ता.शिरपूर), कपिल प्रभाकर सूर्यवंशी (२९, रा.तळोदा ), किरीट इंद्रप्रसाद भट (५२, रा.बडोदा), नाना सखाराम पाटील (७०, ता.शिरपूर), गंडूभाई हमाभाई भडवाल (६०, रा.गुजरात), जसूबेन सिंदन (५०, रा. वाघाडीया गुजरात) अशी मृतांची नावे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 6 killed in bus-truck crash