शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांची एसीबीकडून ६ तास चौकशी

By admin | Updated: June 6, 2015 02:12 IST

कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी)तब्बल सहा तास चौकशी केली.

मुंबई : कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी)तब्बल सहा तास चौकशी केली. चौकशीनंतर त्यांचा तपशीलवार जबाबही नोंदवून घेण्यात आला.भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उघड चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी १८ डिसेंबर रोजी दिले होते. त्यानंतर एसीबीने विशेष तपास पथक नेमून भुजबळ यांचे पुत्र पंकज, पुतणे समीर यांच्यासह भुजबळ कुटुंबीयांशी संबंधित खासगी कंपन्यांचे आजी-माजी संचालक, ब्रोकर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आजी-माजी अधिकाऱ्यांची चौकशी केली. भुजबळ यांच्या चौकशीला कालपासून सुरुवात झाली. गुरुवारी दुपारी २च्या सुमारास भुजबळ एसीबीच्या वरळी येथील मुख्यालयात आले. या चौकशीदरम्यान एसीबीचे काही वरिष्ठ अधिकारीही तेथे हजर होते. चौकशी आटोपून रात्री साडेआठच्या सुमारास भुजबळ एसीबी मुख्यालयातून बाहेर पडले, अशी माहिती एसीबी सूत्रांकडून मिळते. गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल, अशी माहिती एसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.अपर आयुक्त किशोर जाधव यांनी एसीबीच्या वतीने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाच्या आदेशांनुसार उघड चौकशीचे काम वेगाने सुरू आहे. एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी न्यायालयाच्या आदेशांनुसार छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या चौकशीचे काम वेगाने सुरू आहे. चौकशीनंतर आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. यासंदर्भात आम आदमी पार्टीने जनहित याचिका दाखल केली आहे़ भुजबळ बांधकाम मंत्री असताना दिल्लीतील महाराष्ट्र सदनासह विविध कंत्राटे देण्यात आली़ या कंत्राटांद्वारे भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट व त्यांच्या नातलगांच्या कंपन्यांना कोट्यवधी रुपये देण्यात आले़ तेव्हा याची चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे़गेल्या वर्षी या प्रकरणाच्या चौकशीसाठी सक्तवसुली संचलनालय व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांचे संयुक्त पथक स्थापन केले़ या आदेशाला भुजबळ कुटुंबीयांनी आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.