शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
4
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
5
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
6
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
7
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
8
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
10
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
11
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
12
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
13
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
14
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
15
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
16
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
17
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
18
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
20
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?

Maharashtra Political Crisis: आभाळ फाटलंय! शिवसेनेचा पाय आणखी खोलात, ५८ नगरसेवक अन् पदाधिकारी शिंदेगटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 13:27 IST

Maharashtra Political Crisis: एकीकडे आदित्य ठाकरे पक्षबांधणीसाठी राज्यभर दौरे काढत असून, दुसरीकडे दिवसेंदिवस शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबई:शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्यातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. शिवसेनेला पडलेले भगदाड सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. मात्र, दोन जिल्ह्यातील शिवसैनिक, नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन युती सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील ५८ शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नुकतीच माझी भेट घेऊन नव्याने स्थापन झालेल्या युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

आदित्य ठाकरेंची सकाळी सभा, सायंकाळी शिवसैनिक शिंदे गटात

आदित्य ठाकरे यांनी राज्यव्यापी शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात आदित्य ठाकरे भिवंडीत पोहोचले. आदित्य ठाकरे यांनी भिवंडीत आक्रमक भाषण करत एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये चैतन्य संचारेल, नवी उमेद जागेल, अशी चर्चा होती. मात्र, या भाषणाला काही तास उलटत नाही तोच भिवंडीतील शिवसैनिक एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत आणखीनच भर पडल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोटो ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली होती. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महानगरपालिका तसेच ठाणे ग्रामीण विभागातील शिवसेना नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला जाहीर पाठींबा दर्शविला, असे एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांची 'निष्ठा यात्रा' आणि 'शिवसंवाद यात्रे'ने ही पडझड रोखली जाणार की जाणार की उलट परिणाम होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना