58 व्या वर्षी 7 तास धावून 58 किमी अंतर केले पार
By Admin | Updated: June 30, 2016 14:51 IST2016-06-30T14:47:02+5:302016-06-30T14:51:28+5:30
विश्वनाथ पाटील यांनी आपल्या वयाच्या 58 व्या वर्षी 58 किमी अंतर तब्बल 7 तासात पार केले

58 व्या वर्षी 7 तास धावून 58 किमी अंतर केले पार
जयंत धुळप / दि.30 (अलिबाग)
रायगड पाेलीस दलातील राष्ट्रपती पाेलीस पदक प्राप्त क्रिडापटू पाेलीस उप निरिक्षक विश्वनाथ पाटील यांनी आपल्या वयाच्या 58 व्या वर्षी गुरुवारी सकाळी 5 वाजता रायगड जिल्हा पाेलीस मुख्यालयाच्या मैदानावरुन धावण्यास प्रारंभ करुन अलिबाग-पाेयनाड-वडखळ-साई मंदिर (पेण) आणि परत असे 58 किमी अंतर तब्बल 7 तासात पार करुन आपल्या सेवानिवृत्ती दिनी आगळा संदेश महाराष्ट्र पाेलिस दलास दिला आहे.
या दरम्यान वडखळ येथे जयकिसान विद्यामंदिरचे शिक्षक पी.व्ही,म्हात्रे यांनी विद्याथ्यार्ंसह पाटील यांना शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या. कवयित्री स्मिता सहस्रबुद्धे यांनी देखील पाटील यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान पाटील अलिबाग मध्ये परतल्यावर येथील जे.एस.एम.काॅलेजचे प्राचार्य प्रा.अविनाश आेक यांनी काॅलेज जवळ पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. पाेलीस मुख्यालयात पाेहाेचल्यावर एकच जल्लाेष झाला. पाेलिस उप अधिक्षक राजेंद्र दंडाळे आणि अनेक मान्यवरांनी पाटील यांचे अिभनंदन केले.
मला आज काेणताही रेकाॅर्ड नाेंदवायचा नव्हता तर दरराेज व्यायामाकरीता वेळ दिल्यास 58 व्या वर्षी देखील आपण 58 किमी अंतर धावून पार करु शकताे हा संदेश माझ्या पाेलीस दलातील तरुण सहकार्यांना माझ्या कृतीतून द्यायचा हाेता. ताे मी देवू शकलाे याचा माेठा आनंद असल्याचे पाटील यांनी यावेळी बाेलताना सांगून माझ्या उपक्रमास सहकार्य केल्या बद्दल त्यांनी जिल्हा पाेलीस अधिक्षक माे.सुवेझ हक यांना अखेरीस धन्यवाद दिले.