शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
4
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
5
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
6
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
7
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
8
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
9
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
10
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
11
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
12
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
13
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
14
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
15
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
16
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
17
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
18
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
19
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
20
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!

५७५ गोविंदांवर कारवाईचा बडगा

By admin | Updated: August 26, 2016 04:47 IST

दहीहंडी दरम्यान वाहतूक नियम मोडणाऱ्या गोविंदा पथकातील सदस्यांवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला

मुंबई : दहीहंडी दरम्यान वाहतूक नियम मोडणाऱ्या गोविंदा पथकातील सदस्यांवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. बाईकवर ट्रिपल सीट, विना हेल्मेट आणि दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करत मुंबई शहर व उपनगरात कारवाई करण्यात आली. यात एकूण ५७५ जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. सर्वाधिक कारवाई ही विना हेल्मेट आणि ट्रिपल सीटविरोधात करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. गोविंदा पथकांकडून दहीहंडीतील सदस्यांसाठी मोठ्या प्रमाणात बाईक, ट्रक व टेम्पोची सोय केली जाते. मोठ्या प्रमाणात गोविंदा मंडळांकडे ताफा असल्याने अशावेळी वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन गोविंदांकडून केले जाते. त्यामुळे अपघातांचा धोकाही संभवतो. हे पाहता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गोविदांवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला. अनेक गोविंदा हे बाईकवर ट्रिपल सीट असतात. अशा बाईकस्वारांवरही कारवाई करण्यात आली असून जवळपास २२२ जण वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. त्याचप्रमाणे ३५१ विना हेल्मेट बाईकस्वारांवरही कठोर कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यात सर्वाधिक कारवाई कुर्ला, कुलाबा, बोरीवली, भायखळा, दादर परिसरात झाली आहे. गोविंदाकडून दारु पिऊन वाहन चालविण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. वडाळा आणि कांदिवली येथे केलेल्या कारवाईत अवघे दोन जण आढळले. ट्रकवर किंवा टेम्पोवर लटकून तसेच त्याच्या टॉपवर बसून प्रवास करणाऱ्या गोविंदावर मागील वर्षी कारवाईचा बडगा उचलण्यात आलेला असतानाच यंदा त्यांना वाहनातून उतरवून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. अशा वाहनांच्या क्रमांकांची नोंद वाहतूक पोलिसांनी घेतली. महत्वाची बाब म्हणजे नुकतीच एका वाहतूक पोलिसाला पेट्रोल पंपावर एका बाईकस्वाराकडून मारहाणीची घटना घडली होती. त्यामुळे अशी घटना घडू नये यासाठी ज्या ठिकाणी एकच वाहतूक पोलिस तैनात आहे, अशा पोलिसांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांच्या नंबर प्लेटची माहीती घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. (प्रतिनिधी)>मागील वर्षी ८२0 बाईकस्वारांना ट्रिपल सीट महागात पडली होती. यंदा त्याचे प्रमाण कमी झालेले दिसते. तर ट्रकवर लटकून प्रवास करणाऱ्या ६0 केसेसची नोंदही झाली होती.मुंबई शहर व उपनगरातील रस्त्यांवर १७ मोठ्या दहिहंड्या आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यांना होणारी गर्दी पाहता मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते.५७५ गोविंदांवर कारवाई करताना काहींना दंड तर काही गोविंदाकडे पैसे नसल्याने लायसन्स जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.