मुक्त विद्यापीठाचे ५७ अभ्यासक्रम बंद, यूजीसीचा ब्रेक

By Admin | Updated: July 14, 2016 04:08 IST2016-07-14T04:08:00+5:302016-07-14T04:08:00+5:30

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या तब्बल ५७ अभ्यासक्रमांची मान्यता विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) रद्द केल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

57 universities shut open, UGC breaks | मुक्त विद्यापीठाचे ५७ अभ्यासक्रम बंद, यूजीसीचा ब्रेक

मुक्त विद्यापीठाचे ५७ अभ्यासक्रम बंद, यूजीसीचा ब्रेक

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या तब्बल ५७ अभ्यासक्रमांची मान्यता विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) रद्द केल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुक्त विद्यापीठात १३५ अभ्यासक्रम चालविले जातात. त्यातील निम्म्याहून अधिक अभ्यासक्रम हे कौशल्यावर आधारित आहेत.
दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देता यावे, या हेतूने विद्यापीठाने हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. मात्र यातील ५७ अभ्यासक्रमांची यूजीसीने मान्यता रद्द केल्याने अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, रद्द केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, बी. ए. डिझायनिंग, डीएमएलटी, बीएससीआयडी अशा अभ्यासक्रमांचाच अधिक समावेश आहे. पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी राज्यभरातील चार हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. या अभ्यासक्रमाची देखील मान्यता रद्द केली
आहे. विद्यापीठाने यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)

कुलगुरू डॉ. माणिक साळुंखे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शविल्याने नवनिर्वाचित कुलसचिव डॉ. एकनाथ जाधव यांना याबाबत विचारले असता, मी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे मला या विषयाची काहीच कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: 57 universities shut open, UGC breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.