शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
7
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
8
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
9
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
11
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
12
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
13
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
14
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
15
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
16
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
17
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
18
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
19
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
20
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ५६ आरागिरण्या सील, वनविभागाची बघ्याची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2018 4:30 PM

प्रदूषण नियंत्रण मंडळाने औरंगाबाद येथील आरागिरण्यांना किमान प्रदूषण प्रमाणपत्र नसल्यामुळे तब्बल ५६ आरागिरण्या सील केल्या आहेत. एवढेच नव्हे, तर वीजपुरवठादेखील खंडित  करण्याची कारवाई ‘पोल्युशन’ विभागाने केली.

- गणेश वासनिक

अमरावती : प्रदूषण नियंत्रण मंडळाने औरंगाबाद येथील आरागिरण्यांना किमान प्रदूषण प्रमाणपत्र नसल्यामुळे तब्बल ५६ आरागिरण्या सील केल्या आहेत. एवढेच नव्हे, तर वीजपुरवठादेखील खंडित  करण्याची कारवाई ‘पोल्युशन’ विभागाने केली. औरंगाबाद येथे नियमबाह्य आरागिरण्या सील होऊ शकतात तर, अमरावतीत का नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.‘लोकमत’ने ‘चार हजार आरागिरणी परवान्यांचे नियमबाह्य नूतनीकरण’, ‘आरागिरण्यांचे फायर आॅडिट होणार’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून वनविभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले व हा विषय लोकदरबारात मांडला. दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. अमित झनक यांनी तारांकित प्रश्न क्रमांक १०६६२८ अन्वये 'राज्यात चार हजार आरागिरण्यांचे नियमबाह्य नूतनीकरण' हा विषय थेट विधानसभेत नेला. शासनाने यासंदर्भात वनविभागाकडून सविस्तर माहिती मागविली असून, त्याकरिता संपूर्ण वनविभाग कामाला लागला आहे. मात्र, ‘लोकमत’ने उद्योग व कामगार विभागाचे आदेश गुंडाळून आरागिरण्या सुरू असल्याची बाब प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर औरंगाबाद येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने शासन आदेशाचे पालन करण्यासाठी पुढकार घेत त्यांच्या कार्यक्षेत्रातील आरागिरण्यांची तपासणी मोहीम हाती घेतली. त्यानुसार किमान प्रदूषण प्रमाणपत्र तपासणीसाठी ‘पोल्युशन’ मंडळाने आरागिरणी मालकांना ८ डिसेंबर २०१७ रोजी नोटीशी बजावल्यात. तपासणीअंती १५ डिसेंबर २०१७ रोजी एकूण ५६ आरागिरण्यांना मोहोरबंद करण्यात आले. औरंगाबाद येथे नियमबाह्य आरागिरण्या सुरू असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचे धाडस दाखविले. परंतु, अमरावती जिल्ह्यात विना संमतीपत्र १३४ आरागिरण्या सुरू असताना वनविभाग किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदर आरागिरण्यांना सील करण्यासाठी कोणतीही कारवाई केलेली नाही. राज्यात आरागिरणी मालकांना वनविभागाकडून अभय मिळत असल्याने त्या राजरोसपणे सुरू असल्याचे वास्तव आहे. ध्वनीप्रदूषण नियंत्रण कायदा १९७४ मधील तरतुदीनुसार विना दाखला पीयूसी प्रमाणपत्र आरागिरणी चालविल्यास एक लाख रूपये दंडनीय शिक्षा आहे. परंतु, गत ३७ वर्षांपासून याबाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले असून राज्य शासनाचा हजारो कोटींचा महसूल बुडाला आहे. राज्यात चार हजार १०३ आरागिरण्या नोंदणीकृत असून आतापर्यत ५६ आरागिरण्यांना मोहोरबंद करण्यात आल्या आहेत. उर्वरित तीन हजार ९७४ आरागिरण्यांना गत चार महिन्यांपासून सील न करता २०१८ यावर्षी आरागिरणी परवाने नूतनीकरणासाठी वनविभागाकडून सहकार्य केले जात आहे. राज्यात बहुतांश आरागिरण्या या विशिष्ट समुहाच्या असल्याने त्यांचे राजकीय लागेबांधे घट्ट आहे. दिल्लीपासून तर गल्लीपर्यत आरागिरणी मालकांचे मधूर संबंध आहे, हे विशेष.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने ५३ महिन्यांनंतर लागू केले आदेशराष्ट्रीय हरित लवाद अर्ज क्रमांक ३७/२०१३ (वासनसिंग विरुद्ध पंजाब राज्य व इतर) प्रकरणी आरागिरण्यांमुळे हवेत प्रदूषण प्रमाण वाढत असल्याने हवा प्रदूषण नियंत्रण अधिनियम १९७४ व पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील तरतुदीनुसार प्रदूषण नियंत्रणात आणण्याचा दाखला (पीयूसी) घेण बंधनकारक आहे. हरीत लवादाच्या या निर्णयाच्या अनुषंगाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, दिल्ली यांनी ४ जुलै २०१३ रोजी अधिनस्थ सर्व राज्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळांना आरागिरणीसाठी जेथपर्यत पीयूसी प्रमाणपत्र जारी केले जात नाही, तोपर्यत त्या आरागिरण्या मोहोरबंद कराव्यात तसेच त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहे. औरंगाबाद येथे ५६ आरागिरण्या सील करून राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने ५३ महिने म्हणजे ८ डिसेंबर २०१७ रोजी लागू केले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती