शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

 निमगिरी विमान अपघाताला झाली ५७ वर्षे, ९४ जणांचा गेला होता बळी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 20:12 IST

७ जुलै १९६२च्या संध्याकाळी तुफान पावसात इटालियन एअरलाइन्सचे विमान जुन्नरपासून ३० किलोमीटर अंतरावरील दुर्गम आदिवासी भागातील निमगिरी गावातील दौंड या डोंगराला धडकून कोसळले होते.

- नितीन ससाणे-  जुन्नर : सह्याद्रीच्या डोंगररांगांत दुर्गम जंगलात तुफानी पाऊस व वादळवाऱ्यात निमगिरी गावालगत दौंडया डोंगराला धडकून  झालेल्या विमानअपघातात ९४ जणांचा बळी गेला होता. विमानअपघाताच्या या दुर्घटनेला जुलै महिन्यात ५७ वर्षे झाली. अजूनही पावसाळ्यात निमगिरीच्या आदिवासी भागात ज्येष्ठ वयोवृद्ध ग्रामस्थ विमान अपघाताच्या कटू स्मृती जागवतात. ७ जुलै १९६२च्या संध्याकाळी तुफान पावसात इटालियन  एअरलाइन्सचे डग्लस डी सी -८:४३ हे विमान जुन्नरपासून ३० किलोमीटर अंतरावरील आदिवासी दुर्गम निमगिरी गावातील दौंड या डोंगराला धडकून कोसळले होते. या भीषण विमान अपघात विमानातील सर्वच्या सर्व ८५ प्रवाशांसह ९  कर्मचारी असे ९४ जण मृत्युमुखी पडले होते. फ्लाईट ए २७ ७१ ही आॅस्ट्रेलियातील सिडनी आणि इटलीतील रोमदरम्यान आंतरराष्ट्रीय  शेड्युल्ड पॅसेंजर सेवा होती. डरबीन, सिंगापूर, बँकॉक, मुंबई, कराची यामार्गे हा विमान प्रवास होता. बँकॉकच्या डॉन माँग  आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघालेले हे विमान मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळाकडे येत होते. या वेळी मुंबई विमानतळ जवळच्याच अंतरावर आले असताना ३,६०० फूट उंचीवर विमान असताना पावसाळी वातावरणात निमगिरी गावाजवळील डोंगराला धडकून दाट जंगलात चिखलात हे विमान कोसळले होते.

४ रोल्स रॉईस ५०८- १२ कॉनव्हे इंजिन  हे या विमानाने १९६२मध्येच पहिले उड्डाण केले होते. तर, अवघ्या ९६४ तासांचा प्रवास या विमानाने केला होता. सिडनी येथून विमान निघाले तेव्हा ४५ प्रवासी होते, तर डरबीन व सिंगापूर येथे ४० प्रवासी असे एकूण ८५ प्रवासी विमानात  होते. वैमानिक कॅप्टन ल्युगी क्वात्तरीन, सहवैमानिक युगो अरकॅनजील तर फ्लाइट इंजिनिअर ल्युसिनो फोंटाना यांच्यासह ६ कर्मचारी विमानात होते. संध्याकाळी ६.४० वाजता सांताक्रूझ विमानतळावरून विमान औरंगाबाद परिसरात असताना शेवटचा संपर्क झाला होता. कोणता संपर्क नसल्याने विमान डोंगररांगांत किंवा मुंबईजवळच्या  समुद्रात कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. निमगिरीजवळ विमानाचे अवशेष सापडल्याने विमानाचा शोध लागला. वैमानिकाची चूक तसेच परिचित हवाई मार्ग नसल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात आले. आदिवासी भागात निमगिरीला जाण्यासाठी कोणताही रस्ता १९६२मध्ये नव्हता.  जवळचे ठिकाण म्हणजे ३० किमी अंतरावरचे तालुक्याचे जुन्नर गाव. या विमान अपघातानंतर मदत कार्यासाठी सैन्यदलाच्या तुकडीला पाचारण करावे लागले होते. पण, कोणीही प्रवासी वा कर्मचारी जिवंत राहिला नसल्याने केवळ मृतदेहांची वाहतूक करण्याचे काम त्यांना करावे लागल. तसेच, विमानाचे अवशेष त्यांनी गोळा केले होते. विमानाचे पडलेले अवशेष, मृत प्रवाशांच्या चीजवस्तू तेथील स्थानिकानी लांबविल्याचे आजही सांगितले जाते. विमान अपघातातील प्रवाशांच्या वस्तू म्हणून नंतर विकण्याच्या, तसेच सापडलेले परकीय चलन नंतर मुंबई येथे वटविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसी कारवाईदेखील करण्यात आल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात.

***

या विमानातील ऑक्सिजन सिलिंडरपैकी एक सिलिंडर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शाळेची घंटा म्हणून वापरला जात होता. शाळेत सिलिंडर नको म्हणून शिक्षणाधिकाऱ्याच्या सूचनेवरून नंतर तो हलविण्यात आला. कॅलिफोर्निया ४.२. येथील झिपऱ्या मिसाईल ऑक्सिजन कंपनी बनविण्यात येणाऱ्या कंपनीचे हे  सिलिंडर होते.

 

टॅग्स :Junnarजुन्नरAccidentअपघातairplaneविमानDeathमृत्यू