शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

शेतकऱ्यांसाठी ५२५० कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 06:39 IST

१६ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या; महापूर व अवकाळीग्रस्तांना दिलासा

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडी सरकारने १६ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. त्यात शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ५२५० कोटींच्या तरतुदीचा समावेश आहे. महापूर व अवकाळीग्रस्त शेतकºयांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे.क्यार व महाचक्रीवादळामुळे ३४ जिल्ह्यांच्या ३४९ तालुक्यांतील सुमारे ९३ लाख हेक्टरवरील शेतीपिके व फळपिकांचे नुकसान झाले. सुमारे एक कोटी पाच लाख शेतकरी संकटात भरडले गेले. राज्यपालांनी १६ नोव्हेंबर रोजी शेतकºयांसाठी मदत जाहीर केली. त्याचा पहिला हप्ता दिला. दुसºया टप्प्यात ४,५०० कोटी वितरित केले. पुरेशी तरतूद नसल्याने आकस्मिकता निधीतून दिलेल्या या रकमेची भरपाई करण्यासाठी पुरवणी मागण्यांमधून ४,५०० कोटी रुपये देण्यात आले आहेत.अतिवृष्टीमुळे काही जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले. तेथील ज्या शेतकºयांनी पीक कर्ज घेतलेले नाही, पण पिकांचे ३३ टक्क्यांहून जास्त नुकसान झाले आहे, त्यांना एक हेक्टरच्या मर्यादेत एसडीआरएफ व एनडीआरएफमधून द्यायच्या मदतीच्या तिप्पट दराने भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ३८९ कोटी रुपये वितरित केले. त्यासाठी अतिरिक्त ७५० कोटी रुपये पुरवणी मागणीतून दिले आहेत.अतिरिक्त दुधाचे भुकटीत रूपांतर व भुकटी निर्यात यावरील अनुदानासाठी १०० कोटींची तरतूद केली आहे. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी ३९ कोटी, पंतप्रधान पीक विम्याच्या हप्त्यासाठी पाचशे कोटी, सूक्ष्म सिंचन योजनेसाठी ८९ कोटी रुपयांच्या मागण्यांचाही यात समावेश आहे.सार्वजनिक बांधकामच्या २,७८४ कोटींच्या मागण्या असून, हायब्रीड अ‍ॅन्युईटी, बीओटी व मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठीच्या ५५० कोटींचा यात समावेश आहे. सोळा हजार कोटींच्या मागण्यांत ८,५१८ कोटी अनिवार्य खर्चासाठीचे आहेत. ६,८२७ कोटी विविध कार्यक्रमांच्या तरतुदीसाठी तर ७७५ कोटी केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांसाठीचे आहेत.प्रमुख विभागांच्या पुरवणी मागण्या (कोटींमध्ये)उद्योग : १,०२३ । सहकार, पणन व वस्त्रोद्योग : ९८६ । कृषी व पदुम : ९२९जलसंपदा : ८२७ । नगरविकास : ९६ । महिला आणि बालकल्याण : ६४८सामाजिक न्याय : ५४० । आरोग्य : ५०१ । गृह विभाग : ३५८

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार