बीडमध्ये महाप्रसादातून ५०० भाविकांना विषबाधा
By Admin | Updated: August 27, 2015 15:28 IST2015-08-27T11:45:40+5:302015-08-27T15:28:27+5:30
श्रावणी एकादशीनिमित्त तयार करण्यात आलेला महाप्रसाद सेवन केल्यानंतर ५०० हून अधिक भाविकांना विषबाधा झाल्याची दुर्दैवी घटना बीडमध्ये घडली आहे.

बीडमध्ये महाप्रसादातून ५०० भाविकांना विषबाधा
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २७ - श्रावणी एकादशीनिमित्त तयार करण्यात आलेला महाप्रसाद सेवन केल्यानंतर ५०० हून अधिक भाविकांना विषबाधा झाल्याची दुर्दैवी घटना बीडमध्ये घडली आहे. गाडे पिंपळगावात हा दुर्दैवी प्रकार घडला आहे.
श्रावणी एकादशीनिमित्त गाडे पिंपळगावमध्ये महाप्रसादासाठी साबुदाण्याची खिचडी तयार करण्यात आली होती. मात्र ही खिचडी खाल्ल्यानंतर अनेक भाविकांना उलट्या होऊ लागल्या तसेच चक्कर येऊ लागली. विषबाधा झालेल्यांमध्ये महिला व लहान मुलांचे प्रमाण अधिक असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.