‘पोलिसांच्या घरांसाठी हुडकोकडून ५०० कोटी’
By Admin | Updated: January 13, 2015 04:50 IST2015-01-13T04:50:40+5:302015-01-13T04:50:40+5:30
राज्यातील पोलिसांना हक्काची घरे देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली असून त्यासाठी हुडकोकडून ५०० कोटींचे कर्ज घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.

‘पोलिसांच्या घरांसाठी हुडकोकडून ५०० कोटी’
पुणे : राज्यातील पोलिसांना हक्काची घरे देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली असून त्यासाठी हुडकोकडून ५०० कोटींचे कर्ज घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.
पुणे शहर पोलिसांतर्फे आयोजित अत्याधुनिक गस्ती वाहनांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले, पोलिसांच्या जागांवर घरे बांधण्यासाठी तीन ते चार एफएसआय देण्यात येणार असून त्याचा अधिकाधिक वापर करून जास्त पोलीस वसाहती उपलब्ध केल्या जातील. पोलिसांच्या जागांना ‘कमर्शियल व्हॅल्यू’ असेल तर पीपीपी मॉडेल तयार करून तसा प्रस्ताव शासनाला पाठवावा. अन्यथा केवळ पोलिसांसाठी जास्तीत जास्त एफएसआयला या वर्षातच मान्यता देऊन निधी उपलब्ध केला जाईल. ज्यांना राहण्यासाठी जागा नाही अशा पोलिसांच्या घराचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
साप्ताहिक सुट्टीत कामावर येणाऱ्या पोलिसांना त्या दिवसाचे संपूर्ण वेतन देण्यात येईल व त्यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली असल्याचे फडणवीस म्हणाले.