५0 वर्षात वाशिम जिल्ह्याच्या लोकसंख्यावाढीचा ‘वारू’ बेफामपणे उधळला

By Admin | Updated: July 11, 2014 00:05 IST2014-07-10T22:36:25+5:302014-07-11T00:05:24+5:30

गत ५0 वर्षापूर्वी २२.0७ टक्के असणारा लोकसंख्या वाढीचा दर सन २0११ मध्ये १७.२३ टक्यांवर येऊन थांबला असला तरी जिल्ह्यात लोकसंख्या वाढीच्या वारूने बेफानपणे उधळणे थांबविले नाही.

In 50 years, the population of the district of Washim fiercely disrupted the 'Waru' | ५0 वर्षात वाशिम जिल्ह्याच्या लोकसंख्यावाढीचा ‘वारू’ बेफामपणे उधळला

५0 वर्षात वाशिम जिल्ह्याच्या लोकसंख्यावाढीचा ‘वारू’ बेफामपणे उधळला

वाशिम: गत ५0 वर्षापूर्वी २२.0७ टक्के असणारा लोकसंख्या वाढीचा दर सन २0११ मध्ये १७.२३ टक्यांवर येऊन थांबला असला तरी जिल्ह्यात लोकसंख्या वाढीच्या वारूने बेफानपणे उधळणे थांबविले नाही. तब्बल चौपट वाढलेल्या लोकसंख्येने ही बाब अधोरेखित केली आहे. १९५१ मध्ये जिल्ह्याची लोकसंख्या ३,१३,८८८ होती. तथापि, २0११ मध्ये मात्र यात चौपट वाढ होऊन ती तब्बल ११,९७,५00च्या घरात जाऊन पोहोचली आहे. गत काही वर्षांपासून शासनाने लोकसंख्येला आळा घालण्यासाठी केलेले प्रयत्न जिल्हावासीयांच्या फारसे पचनी पडले नाहीत. त्यामुळेच जिल्ह्याच्या लोकसंख्यावाढीची सरासरी राज्याच्या तुलनेत १.२४ टक्यांनी वाढलेलीच आहे. सन २0११ च्या जनगणनेत राज्याच्या लोकसंख्या वाढीची सरासरी १५.९९ आहे. तर जिल्ह्याच्या लोकसंख्या वाढीची सरासरी १७.२३ टक्के आहे. वाढलेल्या लोकसंख्येने समस्या निर्माण केल्या आहेत.

** जिल्ह्याच्या शहरीकरणात झाली झपाट्याने वाढ
सन २00१ च्या जनगणनेच्या तुलनेत सन २0११ च्या जनगणनेत शहरीकरणात झपाट्याने वाढ झाली आहे.
२00१ मध्ये जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, मंगरूळपीर व रिसोड अशा चार शहरातील लोकसंख्या १७८४४५ एवढी होती. सन २0११ मध्ये२११७0२ एवढी झाली आहे. त्या तुलनेत ग्रामिण भागाची लोकसंख्या मात्र कमी होत गेल ी असल्याचे दिसून येत आहे. साक्षरतेच्या प्रमाणात देखील शहरीभाग समोर निघुन गेला आहे.

** जिल्ह्याच्या साक्षरतेमध्येसुद्धा झाली वाढ
सन २00१ च्या जनगणनेच्या तुलनेत सन २0११ च्या जनगणनेत साक्षरतेचे प्रमाण ८.३४ टक्यांनी वाढले आहे. २00१ मध्ये साक्षरतेचे प्रमाण ७३.३६ टक्के होते.तर २0११ मध्ये सदर प्रमाण ८१.७0 टक्यावर पोहोचले आहे. यामध्ये पुरूषांच्या साक्षरतेचे प्रमाण ९0.५४ तर महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण ७२.२६ टक्के आहे. या दहा वर्षाच्या कालखंडात महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण पुरूषांच्या तुलनेत दुपटीने वाढले आहे.

 

Web Title: In 50 years, the population of the district of Washim fiercely disrupted the 'Waru'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.