५० वर्षाच्या इसमाकडून शालेय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
By Admin | Updated: October 9, 2016 09:54 IST2016-10-09T09:54:49+5:302016-10-09T09:54:49+5:30
कोपर्डी घटना राज्यात गाजत असतानाच पारनेर तालुक्यातील पळशी येथे आठ वर्षाच्या शालेय मुलीवर पन्नास वर्षाच्या इसमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

५० वर्षाच्या इसमाकडून शालेय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. ९ : कोपर्डी घटना राज्यात गाजत असतानाच पारनेर तालुक्यातील पळशी येथे आठ वर्षाच्या शालेय मुलीवर पन्नास वर्षाच्या इसमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोपट शंकर साळवे या आरोपीवर गुन्हा दाखल होऊन त्याला मध्यरात्री अटक करण्यात आली आहे.
घटनेनंतर गाव संतप्त झाले असून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मुलगी तिची लहान बहीण व भावासोबत खेळत असताना आरोपीने चॉकलेटचे अमिष दाखवून शेतात नेले. तेथे अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात मुलीचा चुलता घटनास्थळी आला. त्यामुळे आरोपीने पलायन केले. पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.