शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जय हो..! निवडणूक घोषणेआधीच काँग्रेसचा राज्यात ५० जाहीर सभांचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 19:06 IST

राज्यातील सर्व दिग्गज नेतेमंडळींना सभांमध्ये सहभागी होण्याविषयीही कळवण्यात आले आहे.

ठळक मुद्दे८ तारखेपासून पुण्यातून सुरूवात : माजी मुख्यमंत्र्यांसह सगळे नेते सहभागी होणारवातावरणनिर्मिती हाच काँग्रेसच्या सभांचा मुख्य उद्देश

पुणे : लोकसभा निवडणूक  जाहीर होण्याआधीच राज्यात ५० जाहीर सभा घेण्याचा निर्णय काँग्रेसच्या प्रदेश समितीने घेतला आहे. पुण्यातूनच याची सुरूवात होणार असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ८ फेब्रुवारीला ही सभा घेणार आहेत.केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी म्हणून काँग्रेसने काही महिन्यापूर्वी जनसंघर्ष यात्रा काढली. आता या सभा जनसंघर्ष सभा या नावाने घेण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व प्रमुख शहरांना तसेच जिल्हा शाखांना सभांच्या नियोजनाविषयी कळवण्यात आले आहे. जनसंघर्ष यात्रेला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला. बऱ्याच शहरी भागांमध्ये ही यात्रे नेता आली नाही. त्यामुळे शहरी भागांसाठी संघर्ष सभांचे आयोजन केले आहे. वातावरणनिर्मिती हाच या सभांचा मुख्य उद्देश आहे. स्वत: प्रदेशाध्यक्षांनी त्याचे नियोजन केले आहे. सभेमध्ये राज्य तसेच केंद्र सरकारचे जनहितविरोधी धोरण जनतेला समजावून सांगण्यात येईल. त्यासाठी वक्त्यांनी या विषयाचा अभ्यास करावा, स्थानिक नेतृत्वानेही याविषयी आपले मते प्रभावीपणे व्यक्त करावीत अशा सूचना दिल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारचे सत्ता राबवतानाचे अपयश या सभांमधून प्रामुख्याने जनतेसमोर आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळेच स्थानिक पातळीवर बोलण्यासाठी म्हणून त्याच प्रकारचे विषय दिले आहेत. इच्छुक उमेदवारांवर या सभांची जबाबदारी दिली आहे. शहर, जिल्हा शाखेने त्यांना साह्य करावे असे सांगण्यात आले आहे. राज्यातील सर्व दिग्गज नेतेमंडळींना सभांमध्ये सहभागी होण्याविषयीही कळवण्यात आले आहे. अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण हे दोघे माजी मुख्यमंत्री त्यात असतीलच शिवाय विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व पक्षाचे राज्य स्तरावरील अन्य नेतेही सभांमध्ये सहभागी होतील असे नियोजन करण्यात येत आहे. पुण्यातील सभा ८ फेब्रुवारीला भवानी पेठेतील महापालिकेच्या पेस्तनजी शाळेजवळ सायंकाळी ५ वाजता होणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसElectionनिवडणूकAshok Chavanअशोक चव्हाणRahul Gandhiराहुल गांधी