शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील धरणांमध्ये ५० टक्के पाणीसाठा, मुंबईचे पाणी टेन्शन मिटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 01:19 IST

राज्यातील धरणांमध्ये आतापर्यंत ५०.४७ टक्के पाणीसाठा झाला असून पावसाचे व पाणीसाठ्याचे हेच प्रमाण कायम राहिले तर ४५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

मुंबई : राज्यातील धरणांमध्ये आतापर्यंत ५०.४७ टक्के पाणीसाठा झाला असून पावसाचे व पाणीसाठ्याचे हेच प्रमाण कायम राहिले तर ४५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.गेल्या वर्षी आजच्या दिवशी राज्यातील पाणीसाठा हा ४७.७० टक्के होता. यंदा तीन टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ४१ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली होती. २०१६-१७ मध्ये सिंचनाखालील शेतजमिनीचे क्षेत्र ४० लाख हेक्टर इतके होते.मोठ्या सिंचन प्रकल्पांचा विचार करता, आतापर्यंत सर्वाधिक धरणे ही कोकण विभागात (८६.५६ टक्के) तर सर्वात कमी धरणे ही नागपूर विभागात (१७.४४ टक्के) आणि अमरावती विभागात २०.६८ टक्के तर मराठवाड्यात २६.७७ टक्के इतकी भरली आहेत. नाशिक विभागातील मोठी धरणे ६३.४६ टक्के भरली आहेत.मध्यम प्रकल्पांमधील आजचा पाणीसाठा (टक्के) : अमरावती विभाग २७.५६, नागपूर २२.६०, कोकण ८६.८८, नाशिक ३२.०७, पुणे ५५.०७, मराठवाडा १७.९०.लघु प्रकल्पांमधील आजचा पाणीसाठा (टक्के) : अमरावती १८.१९, नागपूर २६.०८, कोकण ७७.५२, नाशिक ३२.३८, पुणे १७.५८ आणि मराठवाडा १२.९८. राज्यातील मध्यम सिंचन प्रकल्पांत ३८.३६ तर लघु प्रकल्पांमध्ये २४.८१ टक्के इतकाच पाणीसाठा आहे.विदर्भ, मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षाराज्यात सर्वात कमी पावसाची नोंद विदर्भ आणि मराठवाड्यात झाली असून अशीच परिस्थिती कायम राहिली तर काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते.मुंबईचे पाणी टेन्शन मिटणारपावसाने गेल्या काही दिवसांत मुंबईत विश्रांती घेतली आहे. मात्र तलाव क्षेत्रांत अधूनमधून वरुण राजाची हजेरी असल्याने मुंबईकरांचे पाणी टेन्शन मिटले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये वर्षभराचा जलसाठा जमा होण्यासाठी केवळ अडीच हजार दशलक्ष लीटर जलसाठ्याची गरज आहे.या वर्षी पावसाने जुलै महिना गाजवला. जोरदार पावसाने मुंबईकरांची दैना उडवली, मात्र तलावांना चांगले दिवस आणले आहेत. त्यामुळे एकाच महिन्यात तुळशी, विहार, तानसा, मोडक सागर असे सर्व प्रमुख तलाव भरून वाहू लागले आहेत. तर मध्य वैतरणा, भातसा आणि अपर वैतरणा तलावामध्येही पाण्याची चांगली स्थिती आहे.मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा होतो. वर्षभर हा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार लीटर जलसाठा दरवर्षी असणे आवश्यक असते. त्यानुसार आजच्या घडीला तलावांमध्ये ८३ टक्के म्हणजे १२ लाख ३ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे.जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये )तलाव कमाल किमान आजची स्थितीमोडक सागर १६३.१५ १४३. २६ १६१.१५तानसा १२८.६३ ११८.८७ १२८.५७विहार ८०.१२ ७३.९२ ८०.१६तुळशी १३९.१७ १३१.०७ १३९.१६अपर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ ६०१.२९भातसा १४२.०७ १०४.९० १३५.८५मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० २८३.४२

टॅग्स :DamधरणWaterपाणी