वीज कनेक्शन नसताना ५ हजारांचे बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2016 03:16 IST2016-09-05T03:16:30+5:302016-09-05T03:16:30+5:30

बोईसर पूर्वेकडील शिगाव हाकारीपाडा येथील एका आदिवासी व्यक्तीने वीजपुरवठ्यासाठी १५ महिन्यांपूर्वी पैसे भरूनही वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा तर दिलाच नाही

5 thousand bills without electricity connection | वीज कनेक्शन नसताना ५ हजारांचे बिल

वीज कनेक्शन नसताना ५ हजारांचे बिल


बोईसर : बोईसर पूर्वेकडील शिगाव हाकारीपाडा येथील एका आदिवासी व्यक्तीने वीजपुरवठ्यासाठी १५ महिन्यांपूर्वी पैसे भरूनही वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा तर दिलाच नाही, उलट ५ हजार १३० रुपयांचे वीजबिल पाठवून धक्का दिला आहे.
विजेचे कनेक्शन नसताना वीजबिल पाठवण्याची जी तत्परता दाखविली, तशी तत्परता वीजजोडणीकरिता का दाखवण्यात आली नाही, असा संतप्त सवाल आदिवासी कुटुंबाकडून विचारण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीच्या सरावली सेक्शनअंतर्गत शिगाव हाकरीपाडा येथील आदिवासी समाजातील रामू कोड्या हेमाडा हे कुटुंबासह राहत असून त्यांनी वीज वितरण कंपनीच्या बोईसर ग्रामीण उपविभागच्या उपकार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात दि. १४ मे २०१५ रोजी वीजपुरवठ्यासाठी रीतसर ६०० रुपये भरले आहेत. त्या १५ महिन्यांच्या कालावधीत त्यांनी वीजपुरवठा मिळावा, त्याकरिता अनेक वेळा चक्राही मारल्या, परंतु १५ महिन्यांनंतरही त्यांचे कुटुंब वीजपुरवठ्यापासून वंचित आहे.
राम हेमाडा या शेतकारी व शेतमजुराला त्यांच्या नावे १९ जुलै २०१६ रोजी पाठवण्यात आलेल्या वीजबिलावर ग्राहक क्र. ००३५५०००६५७९ तर मीटर क्र. डी. ३०६९५०० असून एकूण वीज पॉवर ७० युनिट तर जून २०१६ चे ८२६ युनिटचा वापर दाखवून मागील व चालू असे एकूण रु. ५१३०/- चे वीजबिल पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे हेमाडा कुटुंबाला वीज नसताना बिलाचा शॉक दिल्याने मानसिक त्रास सहन करावा लागला. अजुनही त्यांच्याकडे वीज नाही. (वार्ताहर)
>रामू हेमाडा यांना वीजपुरवठा देण्याची कार्यवाही आम्ही लगेच करू.
- महेश गोधळेकर, सहायक अभियंता (सरावली सेक्शन)

Web Title: 5 thousand bills without electricity connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.