शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जानकर, गिरकर यांच्यासह 5 जणांना भाजपाकडून विधान परिषदेची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 16:07 IST

राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

मुंबई : राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपाकडून महादेव जानकर, भाई गिरकर, राम पाटील रातोळीकर, रमेश नारायण पाटील व नीलय नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.निवडणूक बिनविरोध झाल्यास भाजपाच्या पाच, शिवसेनेच्या दोन, काँग्रेसच्या दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार निवडून येईल. 11वी जागा ही शेकापचे जयंत पाटील लढतील आणि सर्वपक्षीय संबंधांचा फायदा घेत तेही बिनविरोध निवडून येतील, असे मानले जात आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतात.रायगड आणि आसपासच्या भागात भाजपा आणि शिवसेनेसाठी हे धोक्याचे आहे. त्यामुळे भाजपाने सहावा उमेदवार द्यावा आणि कसेही करून जयंत पाटील यांना पराभूत करावे, असा एक प्रवाहदेखील भाजपात आहे. काँग्रेसने शरद रणपिसे आणि मिर्झा वजाहत अख्तर यांना तर राष्ट्रवादीने बाबा जानी दुर्रानी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 16 जुलैला निवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिलीय. 27 जून रोजी रिक्त होणाऱ्या पदांसाठी ही निवडणूक होणार आहे. विधान परिषदेचे सदस्य जयदेवराव गायकवाड, विजय गिरकर, माणिकराव ठाकरे, संजय दत्त, अनिल परब, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडित, शरद रणपिसे, सुनील तटकरे, महादेव जानकर आणि जयंत पाटील यांचा कार्यकाळ येत्या 27 जुलै रोजी पूर्ण होत आहे. 16 जुलै या दिवशी होणाऱ्या मतदानाचा निकाल त्याच दिवशी लागणार आहे. सायंकाळी 5 नंतर मतमोजणी होईल, असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदBJPभाजपा