आर्थिक व्यवहारातून ५ जणांचे अपहरण
By Admin | Updated: August 1, 2016 01:12 IST2016-08-01T01:12:54+5:302016-08-01T01:12:54+5:30
एका वाहतूक व्यावसायिकांसह ५ जणांचे अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री घडली

आर्थिक व्यवहारातून ५ जणांचे अपहरण
नागपूर : आर्थिक व्यवहारातून वितुष्ट आल्यामुळे एका वाहतूक व्यावसायिकांसह ५ जणांचे अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री घडली.
वाहतूक व्यवसायी आणि त्यांचे ४ सहकारी रविवारी मोहडफाटा येथे दर्शनाला गेले होते. परत येत असताना रात्री १२ च्या सुमारास नंदनवन नाक्याजवळ त्यांची टाटा एस गाडी आरोपींनी रोखली. त्यानंतर या गाडीत बसलेल्या पाच जणांना आरोपींनी अज्ञात ठिकाणी नेले. तेथून संधी साधून एकाने फोन करून पोलिसांना ही माहिती कळविली. पाच जणांचे अपहरण झाल्याचे कळाल्याने पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली. नंदनवनचा पोलीस ताफा आरोपींच्या शोधार्थ रवाना झाला. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणातील आरोपी किंवा फिर्यादीचे नाव पोलिसांकडून स्पष्ट झाले नव्हते.