शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेच्या ५ जागा अन् ८३ उमेदवार; अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट, २ फेब्रुवारीला निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 09:38 IST

२७ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. ३० जानेवारीला होणार मतदान

मुंबई : शिंदे फडणवीस आणि महाविकास आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी २७ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत आता एकूण ८३ जण रिंगणात आहेत. 

नाशकात दुहेरीउद्धव ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या अपक्ष शुभांगी पाटील या मूळ भाजपाच्या असल्यामुळे अखेरच्या क्षणी त्यांचे मन वळविण्यात येईल अशी चर्चा केली जात असताना पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवली. भाजपाने एबी फॉर्म नाकारलेले व अपक्ष अर्ज दाखल केलेले धनंजय जाधव व धनराज विसपुते या दोघांनीही माघार घेतली. त्यामुळे सत्यजित तांबे व शुभांगी पाटील या अपक्ष उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे. 

मराठवाड्यात बहुरंगीऔरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे सोमवारी निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप सोळुंके यांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आ. विक्रम काळे यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 

नागपुरात तिरंगी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माघार घेत ही जागा काँग्रेसला सोडण्यास संमती दिली. शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी अर्ज मागे घेतला. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना पाठिंबा देत असल्याचे काँग्रेसने जाहीर केले. आता अडबाले हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून लढतील. अपक्ष उमेदवारी दाखल करणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते सतीश इटकेलवार यांनी माघार न घेतल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

अशा रंगणार लढती...

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघअर्ज मागे घेतले - ६रिंगणातील उमेदवार - १६

प्रमुख लढत - १. सत्यजित तांबे (अपक्ष)२. शुभांगी पाटील (अपक्ष)

मराठवाडा शिक्षक मतदारसंघअर्ज मागे घेतले - १रिंगणातील उमेदवार - १४

प्रमुख लढत - १. विक्रम काळे (राष्ट्रवादी काँग्रेस), २. प्रदीप सोळुंके (राष्ट्रवादी बंडखोर), ३. प्रा. किरण पाटील (भाजप), ४. कालिदास माने (वंचित बहुजन आघाडी), ५. सूर्यकांत विश्वासराव (मराठवाडा शिक्षक संघ)

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघअर्ज मागे घेतले - ५रिंगणातील उमेदवार - २२

प्रमुख लढत - १. नागो गाणार (शिक्षक परिषद,  भाजप समर्थित), २. राजेंद्र झाडे (शिक्षक भारती), ३. सुधाकर अडबाले (विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, मविआ समर्थित)

अमरावती पदवीधर मतदारसंघअर्ज मागे घेतले - १०रिंगणातील उमेदवार - २३

प्रमुख लढत - १. डॉ. रणजित पाटील (भाजप), २. धीरज लिंगाडे (काँग्रेस), ३. अनिल अमलकार (वंचित बहुजन आघाडी), ४. डॉ. गौरव गवई (बहुजन भारत पार्टी)

कोकण शिक्षक मतदारसंघअर्ज मागे घेतले - ५रिंगणातील उमेदवार - ८

प्रमुख लढत - १. ज्ञानेश्वर म्हात्रे (भाजप), २. बाळाराम पाटील (अपक्ष)

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस