स्वाइन फ्लूमुळे राज्यात ५ मृत्यू

By Admin | Updated: August 29, 2015 01:39 IST2015-08-29T01:39:02+5:302015-08-29T01:39:02+5:30

स्वाइन फ्लूमुळे राज्यात गुरुवारी ५ जणांचा मृत्यू झाला. मागील वर्षापासून पुणे, मुंबई, नाशिक यांसह इतर शहरांतही स्वाइन फ्लूचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. गुरुवारी राज्यात

5 deaths due to swine flu | स्वाइन फ्लूमुळे राज्यात ५ मृत्यू

स्वाइन फ्लूमुळे राज्यात ५ मृत्यू

पुणे : स्वाइन फ्लूमुळे राज्यात गुरुवारी ५ जणांचा मृत्यू झाला. मागील वर्षापासून पुणे, मुंबई, नाशिक यांसह इतर शहरांतही स्वाइन फ्लूचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. गुरुवारी राज्यात एकूण ४,५६२ रुग्णांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. यातील २५१ संशयित रुग्णांना आॅसेलटॅमिवीर हे औषध देण्यात आले. ६३ रुग्णांना स्वाइन फ्लू असल्याचे स्पष्ट झाले. राज्यभरात गुरुवारी २५ रुग्णांना स्वाइन फ्लूमुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: 5 deaths due to swine flu