शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात ५ कोटी रोजगार निर्मिती करणार : नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 20:00 IST

ग्रामीण उद्योगांची सध्याची उलाढाल ७५ हजार कोटी रुपये

ठळक मुद्देव्हिलेज इंडस्ट्रीच्या माध्यमातून ५ लाख कोटींची उलाढालीचे लक्ष्यशिवाजीनगर येथील केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला गडकरी यांनी दिली भेट देशातील उद्योगांपैकी सूक्ष्म आणि लघु उद्योगाचा वाटा २९ टक्के शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याने, आत्महत्या कमी होतील 

पुणे : शेतमाल प्रक्रिया उद्योग, दूध, मत्स्य व्यवसाय, मध, बांबू आणि इतर वनोत्पादने, जैव इंधन, वनौषधी अशा विविध माध्यमातून ग्रामीण भागामधे उद्योग निर्मिती करण्यात येईल. या व्हिलेज इंडस्ट्रीजच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांमधे पाच कोटी रोजगार निर्मिती करण्यात येणार असून, या उद्योगाची उलाढाल ५ लाख कोटींवर नेण्याचे उद्दीष्ट आहे. त्याबाबतचे धोरण लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी येथे दिली. शिवाजीनगर येथील केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला गडकरी यांनी भेट दिली. मध आणि त्या पासून केलेल्या विविध पदार्थांची त्यांनी माहिती घेतली. तसेच, मध उत्पादकांशी देखील त्यांनी संवाद साधला. केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. संजीव राय, खादी ग्रामोद्योग आयोगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय हेडाऊ या वेळी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, देशासह महाराष्ट्राला समृद्ध समुद्र किनारा आहे. बांबू आणि वन औषधींमधे विक्री वाढू शकते. मत्स्य उत्पादन वाढीसाठी कोचीनला ट्रॉलर तयार केला आहे. त्या माध्यमातून समुद्रात शंभर किलोमीटर अंतरापर्यंत जाता येईल. त्यामुळे मत्स्य उत्पादन वाढेल. सध्या भारतातून २० हजार कोटी रुपयांची आयुर्वेदिक औषधे निर्यात केली जातात. ही निर्यात १ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात येईल. बांबू, मध आणि खादी उत्पादनाला वाव देण्यात येईल.देशातील उद्योगांपैकी सूक्ष्म आणि लघु उद्योगाचा वाटा २९ टक्के आहे. तर, या क्षेत्रातून ४९ टक्के निर्यात केली जाते. जवळपास ११ कोटी रोजगार या क्षेत्राने दिले आहेत. ग्रामीण उद्योगांची सध्याची उलाढाल ७५ हजार कोटी रुपये असून, येत्या पाच वर्षांत ती ५ लाख कोटी रुपये करण्यात येतील, त्यामुळे रोजगारासाठी ग्रामीण भागातील व्यक्तींना शहरात यायची गरज भासणार नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याने, आत्महत्या देखील कमी होतील. ----------विमानातही मधाचा वापर करणारविमानामधे देण्यात येणाऱ्या कॉफी अथवा चहामधे टाकण्यासाठी साखरेबरोबर मधाचा पर्याय द्यावा यासाठी विमान कंपन्यांशी चर्चा करण्यात येईल. तसेच, मिठाईमधे देखील मधाचा वापर वाढावा यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. मध आणि त्यापासून होणाऱ्या विविध पदार्थांसाठी देशभरात हनी क्लस्टर उभारले जातील. त्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनीसांगितले

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीairplaneविमानCentral Governmentकेंद्र सरकार