शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
2
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
3
Maharashtra BMC Exit Poll Result 2026 Live: मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता? एक्झिट पोलचे अंदाज काय?
4
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
5
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
6
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
7
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
8
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
9
परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
10
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
11
IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत
12
शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
13
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
14
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
15
'ट्रम्प' धोरणांचा दुहेरी फटका! व्हिसा स्टॅम्पिंगमध्ये होणाऱ्या विलंबामुळे भारतीयांना नोकऱ्या जाण्याची भीती
16
स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
17
"हे बोगस मतदानासाठी तर नाही ना", व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी संपूर्ण प्रक्रियेवर उपस्थित केली शंका
18
रशियाच्या रडारवर दोन युरोपियन देश; पुतीन यांच्या डोळ्यात का खुपत आहेत ब्रिटन आणि जर्मनी?
19
I-PAC Raid Case: सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना दणका; आय-पॅक प्रकरणात धाडली नोटीस!
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात 47 हजार कोटींची गुंतवणूक, नोकरीच्या मोठ्या संधी; पुण्यात ३० हजार, औरंगाबादेत १० हजार रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 05:51 IST

47,000 crore investment in Konkan, huge job opportunities : एकूण गुंतवणुकीच्या ४७ हजार ४५ कोटी (७७ टक्के) गुंतवणूक एकट्या कोकण विभागात झाली आहे. 

- विशाल शिर्के 

पिंपरी : कोरोनाच्या काळातही महाराष्ट्राने हजारो कोटींची गुंतवणूक खेचली असून, त्यातील सर्वाधिक गुंतवणूक कोकण विभागाने आकर्षित करण्यात यश मिळविले आहे. एकूण गुंतवणुकीच्या ४७ हजार ४५ कोटी (७७ टक्के) गुंतवणूक एकट्या कोकण विभागात झाली आहे. खालोखाल औरंगाबाद आणि पुणे विभागात गुंतवणुकीचे प्रमाण अधिक आहे. मात्र, यातील एकही उद्योग विदर्भात आलेला नाही. मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत देशातील २५ उद्योगसमूहांनी ६१ हजार ४२ कोटी ५३ लाख रुपयांच्या गुंतवणुकीबाबत परस्पर सामंजस्य करार केले आहेत. त्यात सर्वाधिक प्रतिसाद कोकणासाठी मिळालेला आहे. 

अशी होणार गुंतवणूक 

राज्यभरातील गुंतवणुकीची माहिती; वाचा कोणते प्रकल्प कोणत्या विभागात?

पुणे विभाग - गोयलगंगा आयटी पार्क हिंजवडी फेज-४ १ हजार कोटी, रोजगार-१० हजार- जीजी मेट्रोपोलीस आयटी पार्क-वाघोलीदीड हजार कोटी, रोजगार -१५ हजार- ग्रॅविस फूड प्रोसेसिंग-केसुर्डी७५ कोटी, रोजगार १००- बजाज ऑटो-चाकण६५० कोटी, रोजगार-अडीच हजार)- ॲम्पस फार्मटेक्स अभियांत्रिकी-बारामती१०४ कोटी, रोजगार २२०- क्लीन सायन्स टेक्नॉलॉजी, रसायन- कुरकुंभ१३२.४ कोटी, रोजगार ७५०- सोनाई इटेबल्स-खाद्यतेल रिफायनरी-इंदापूर१८९.५७ कोटी, रोजगार ३००

सातारा विभाग - एक्साइड इंडस्ट्रीज-बॅटरी, फलटण ५०० कोटी, रोजगार १०००- कोल्हापूर : सुनील प्लास्टिक इंडस्ट्रीज, विकसक - हातकणंगले ११० कोटी, रोजगार ५००

अमरावती विभाग - श्रीधर कॉटसाइन-वस्त्रोद्योग, अमरावती ३६९ कोटी, रोजगार ५२०- हरमन फिनोकेम-रसायन, अमरावती ५३६.५ कोटी, रोजगार दीड हजार

औरंगाबाद विभाग - इन्स्पिरा इन्फ्रा, शेंद्रा-अ‍ौरंगाबाद ७५०० कोटी, रोजगार १० हजार

कोकण विभाग  - जुबिलंट फूड्स- अन्नप्रक्रिया- पाताळगंगा, रायगड १५० कोटी, रोजगार ४००- जेएसडब्लू स्टील-डोलवी रायगड २० हजार कोटी, रोजगार ३०००- सेंच्युअर फार्मा, अ‍ौषध निर्मिती- अंबरनाथ, ठाणे ३०० कोटी, रोजगार १५००- के रहेजा, आयटी- टीटीएल ठाणे ७५०० कोटी, रोजगार ७० हजार- इंडियन कॉर्पो- लॉजिस्टिक- भिवंडी ठाणे ११०४९.५ कोटी, रोजगार ७५ हजार- कीर्तीकुमार स्टील उद्योग, वाडा, पालघर७५०० कोटी, रोजगार ६० हजार- मलक स्पेशालिटी-रसायन, महाड, रायगड४५.५६ कोटी, रोजगार ६०- रेन्युसिस इंडिया, अपारंपरिक ऊर्जा, पाताळगंगा ५०० कोटी, रोजगार दीड हजार

नाशिक विभाग - सुमेरू पॉलिएस्टर-टेक्स्टाइल, नवापूर-धुळे ४२५ कोटी, रोजगार ५००- नवापूर इंडस्ट्रीयल पार्क- इंडस्ट्रियल इन्फ्रा- नवापूर-धुळे २०० कोटी, रोजगार १००- जेनक्रेस्ट बायो-वस्त्रोद्योग- भुसावळ-जळगाव५०० कोटी, रोजगार ५००- अंबर एंटरप्राइजेस-उत्पादन, सुपा-अहमदनगर १०० कोटी, रोजगार २२०- ग्रँड हॅण्डलूम-वस्त्रोद्योग - नरडाणा १०६ कोटी, रोजगार २१०

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रbusinessव्यवसायjobनोकरी