महिला डॉक्टरला ४५ लाखांचा गंडा

By Admin | Updated: July 31, 2016 04:42 IST2016-07-31T04:42:07+5:302016-07-31T04:42:07+5:30

रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून ठाण्यातील महिला डॉक्टरला ४५ लाखांचा गंडा घातला.

45 lakhs for women doctor | महिला डॉक्टरला ४५ लाखांचा गंडा

महिला डॉक्टरला ४५ लाखांचा गंडा


ठाणे : रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून ठाण्यातील महिला डॉक्टरला ४५ लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात एका कुटुंबातील चौघांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लुईसवाडीत हेमलता हंकारे यांचे अमृता नर्सिंग होम आहे. वज्रेश्वरी येथील अजय किसन राऊत हे वेळोवेळी त्यांच्या रुग्णालयात उपचारासाठी येत. याचदरम्यान, त्यांची पत्नी स्वाती, त्यांची सासू सुरेखा पाटील आणि मेहुणी पालवी यांनी डॉक्टरांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, अजय याने डॉक्टरांना रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, त्याने डॉक्टरांकडून जमीन खरेदी करण्यासाठी ६५ लाख घेतले. त्यातील २० लाख त्याने डॉक्टरांना परत केले. तसेच याच वेळी या व्यवहारामध्ये मुंबईतील अनिल कल्याणकर यांनी पैसे परत करण्याची हमी स्टॅम्पपेपरवर दिली होती. मात्र, ठरल्यानुसार एक एकर जमीन किंवा ४५ लाख परत मिळत नसल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत त्या पाच जणांविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) एस.एन. वाघ करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 45 lakhs for women doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.