म्हाडाच्या लॉटरीत यंदा ४,४६८ घरे
By Admin | Updated: February 12, 2015 05:13 IST2015-02-12T05:13:05+5:302015-02-12T05:13:05+5:30
मुंबापुरीत घर घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. यंदा म्हाडाच्या वतीने तब्बल ४ हजार ४६८ घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. मुंबई मंडळाच्या ७८५ आणि कोकण मंडळाच्या

म्हाडाच्या लॉटरीत यंदा ४,४६८ घरे
मुंबई : मुंबापुरीत घर घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. यंदा म्हाडाच्या वतीने तब्बल ४ हजार ४६८ घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. मुंबई मंडळाच्या ७८५ आणि कोकण मंडळाच्या ३ हजार ६८३ घरांचा यामध्ये समावेश असून, मुंबई मंडळाच्या घरांची लॉटरी मे महिन्यात आणि कोकण मंडळाच्या घरांची लॉटरी डिसेंबर महिन्यात काढण्यात येईल.
मुंबई मंडळाच्या घरांच्या किमती ९ ते ३३ लाख रुपयांच्या घरात असणार असून, कोकण मंडळाच्या घरांची किंमत २४ ते ४७ लाख घरांच्या असणार आहे. शिवाय मे महिन्यात अंध-अपंग प्रवर्गासाठी स्वतंत्र अशा ६६ घरांच्या वर्षभरात तीन सोडती काढण्यात येणार आहेत.
यंदा गतवर्षाच्या तुलनेत घरांच्या किमती कमी आहेत. दरम्यान,
गतवर्षी विरार येथील घरांची किंंमत २६ ते ५० लाख रुपये होती. या वेळी मात्र ही किंमत २४ ते ४७ लाख रुपये असणार आहे. (प्रतिनिधी)