शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ४३ कारखान्यांची धुराडी बंद , १५० दीडशे कारखाने सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 19:41 IST

यंदा मॉन्सूनने दिलेली ओढ आणि उसावर हुमणी रोगाच्या झालेल्या प्रादुभार्वामुळे साखरेचे उत्पादन ९५ लाख टनांपर्यंत घसरेल असा अंदाज साखर क्षेत्रातून वर्तविण्यात आला होता.

ठळक मुद्देसाखर उत्पादन गेले ९५ लाख टनांवरमंडलिक, जयवंत आणि सोमेश्वर साखर उताऱ्यात अव्वल 

पुणे : राज्यातील १९३ पैकी ४३ कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, ८५७.३३ लाख टन ऊस गाळपातून ९५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा देखील ११.१० टक्के इतका मिळाला आहे. राज्य,यंदाही साखर उत्पादनाचा शंभर लाख टनांचा आकडा पार करेल अशी स्थिती आहे. गेल्या हंगामात देशात साखरेचे ३२० लाख टन उत्पादन झाले होते. त्यात राज्याचा वाटा १०७ लाख टनांचा होता. यंदा मॉन्सूनने दिलेली ओढ आणि उसावर हुमणी रोगाच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे साखरेचे उत्पादन ९५ लाख टनांपर्यंत घसरेल असा अंदाज साखर क्षेत्रातून वर्तविण्यात आला होता. मात्र, अजूनही राज्यातील दीडशे कारखाने सुरु आहेत. त्यातही पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर या ऊस पट्ट्यातील बहुतांश कारखान्यांमधील गाळप सुरु असल्याने यंदा देखील साखर उत्पादनाचा शंभर लाख टनांचा आकडा पार होईल अशी स्थिती आहे. कोल्हापूर विभागातील २६ सहकारी आणि १२ खासगी कारखान्यांमधे १९७.१६ लाख टन ऊस गाळपातून २४ लाख टन साखर उत्पादन झाले असून, सरासरी साखर उतारा १२.२४ टक्के मिळाला. पुणे विभागातील ३१ कारखान्यांतून १८० लाख टन ऊस गाळपातून २० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर, साखर उतारा ११.४२ टक्के मिळाला. सोलापूर जिल्ह्यातील ४३ कारखान्यांनी १९६.१४ लाख टन ऊस गाळपातून १९ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले असून, साखर उतारा १०.१७ टक्के आहे. अहमदनगर येथील २८ साखर कारखान्यांमध्ये १२८.०५ लाख टन ऊस गाळपातून १३.९० लाख टन साखर उत्पादन झाले असून, १०.८९ टक्के साखर उतारा मिळाला. औरंगाबाद येथील २४ कारखान्यांतून ७८.६९ लाख टन ऊस गाळपातून ८ लाख टन आणि नांदेड येथील २३ कारखान्यांमधून ६८.७४ लाख टन ऊस गाळपातून सात लाख टन साखर उत्पादन झाले. औरंगाबादचा साखर उतारा १०.३७ आणि नांदेडचा ११.०५ टक्के इतका आहे. अमरावती विभागात ३.१३ लाख टन ऊस गाळपातून ३० हजार टन साखरेचे उत्पादन झाले असून, नागपूरात ५.१२ लाख टन ऊस गाळपातून ५० हजार टन साखरेचे उत्पादन झाले. येथील साखर उतारा अनुक्रमे १०.३२ आणि ९.८९ टक्के इतका आहे.  --------------मंडलिक, जयवंत आणि सोमेश्वर साखर उताऱ्यात अव्वल कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मंडलिक कारखान्याचा साखर उतारा राज्यात सर्वाधिक १२.८५ टक्के (म्हणजे १०० किलोला १२.८५ किलो साखर) इतका आहे. या कारखान्याने पाच मार्च अखेरीस ४ लाख ५३ हजार ९१० टन ऊस गाळपातून, ५ लाख ८३ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. खालोखाल साताºयाच्या जयवंत शुगरने १२.८३ इतका साखर उतारा मिळविला आहे. येथे ५ लाख २० हजार ७० टन ऊस गाळपातून ६ लाख ६७ हजार २०० क्विंटल साखर उत्पादित झाली. पुण्यातील सोमेश्वर साखर कारखान्याला ११.९५ टक्के साखर उतारा मिळाला. येथे ७ लाख ७९ हजार ३२० टन ऊस गाळपातून, ९ लाख ३१ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. 

हंंगाम संपलेल्या कारखान्यांची संख्या कोल्हापूर  १२, पुणे ६, सोलापूर ११, अहमदनगर ७, औरंगाबाद २, नांदेड ३, अमरावती २

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी