शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदांचा जलजीवनचा ४२० कोटींचा निधी एका दिवसात जीवन प्राधिकरणाकडे वळवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 10:00 IST

राज्य दुष्काळाच्या छायेत असताना जलजीवन मिशन अंतर्गत चालू असलेल्या पाणीपुरवठा योजनांवर याचा परिणाम होण्याची भीती काही जिल्हा परिषदांमधील अधिकारी व्यक्त करत आहेत.

मुंबई : राज्यातील २८ जिल्ह्यांतील जलजीवन मिशन योजनेतील ४२०.७८ कोटी रुपये शासनाने २८ ऑगस्ट रोजी रात्री अचानक परत घेतले. हा निधी जलजीवन प्राधिकरणाकडे वळविला आहे. एका दिवसात घेतलेल्या या निर्णयाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांची आर्थिक कोंडी झाली आहे.राज्य दुष्काळाच्या छायेत असताना जलजीवन मिशन अंतर्गत चालू असलेल्या पाणीपुरवठा योजनांवर याचा परिणाम होण्याची भीती काही जिल्हा परिषदांमधील अधिकारी व्यक्त करत आहेत. हा निधी काढून घेताना जिल्हा परिषदांना विचारण्यात आले नाही, तसेच हा निधी विहित कालावधीत खर्च करावा, अशा सूचनाही करण्यात आल्या नव्हत्या, असेही काही अधिकाऱ्यांनी सांगितले.

किती निधी गेला परत  बीडचे सर्वाधिक ६३.०४ कोटी, छत्रपती संभाजीनगर ७.३३ कोटी, जालना १.४७, लातूर १३.९३, हिंगोली १३.१९, अहमदनगर २४.१९, अकोला ४.४०, भंडारा १.४७, चंद्रपूर २०.५२, धुळे २.२०, गडचिरोली १०.२६, गोंदिया ६.६०, जळगाव २४.९२, कोल्हापूर ३२.९९, नागपूर ११, नंदुरबार ३.६७, नाशिक २०.५२, पालघर २.९३, पुणे २८.५९, रत्नागिरी १८.३३, सांगली २७.८६, सातारा २९.३२, सिंधुदुर्ग ४.४०, सोलापूर ३२.९९, ठाणे ०.७३, वर्धा २.९३, वाशिम २.२० आणि यवतमाळ जिल्ह्यातून ८.८० कोटी, असा एकूण ४२०.७८ कोटी रुपयांचा निधी परत गेला आहे.

ज्या जिल्हा परिषदांनी मागील दीड महिन्यांपूर्वी दिलेला निधी खर्च केला नाही त्यांचा निधी काढून घेतला आहे. १५ दिवसांपूर्वी जिल्हा परिषदांना निधी दिला, तो कायम आहे. केंद्राकडून जलजीवन मिशन योजनेसाठी निधी मिळतो. त्यातील ७५ टक्के वेळेत खर्च केला नाही तर पुढील निधीस विलंब होतो. जिल्हा परिषदांनी जास्तीत जास्त निधी खर्च करावा, केंद्राकडून २० दिवसांत आणखी निधी मिळणार असून, तो जिल्हा परिषदांकडे वर्ग केला जाईल. - डॉ. अमित सैनी, अभियान संचालक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन

टॅग्स :zpजिल्हा परिषदWaterपाणी