सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 12:35 IST2025-08-03T12:34:41+5:302025-08-03T12:35:03+5:30
खोब्रागडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागाचा निधी हा केवळ अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी आहे. लाडकी बहीण योजना ही सामाजिक न्याय विभागाची योजना नाही.

सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
नागपूर : लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटी रुपयांचा निधी वळता केला असून या वर्षात आणखी निधी वळता केला जाऊ शकतो, अशी शक्यता संविधान फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांनी वर्तविली असून, सामाजिक न्याय मंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
खोब्रागडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागाचा निधी हा केवळ अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी आहे. लाडकी बहीण योजना ही सामाजिक न्याय विभागाची योजना नाही. याचा लाभ पात्र असलेले सगळेच घेऊ शकतात. अनुसूचित जातीच्या महिला लाभार्थी जरी असल्या तरी खर्च जनरल फंडातून केला पाहिजे. सामाजिक न्याय विभागाचा निधी यासाठी वापरता येणार नाही. असे करणे नीती आयोगाने दिलेल्या धोरणात्मक निर्देशाविरुद्ध आहे.