शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ४१ साखर कारखान्यांची धुराडी बंद ; ५४ लाख टन साखर उत्पादित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 22:00 IST

पुणे, कोल्पापूर, सोलापूरातील प्रत्येकी ५ कारखाने बंद

ठळक मुद्देयापूर्वीच्या सलग दोन हंगामामधे राज्यात विक्रमी १०७ लाख टनांहून अधिक साखर उत्पादन यंदा ६० ते ६२ लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज

पुणे : राज्यातील १४६ कारखान्यांनी ४९२ लाख टन उसाचे गाळप केले असून, ५४ लाख ७० हजार टन साखर उत्पादित केली आहे. तर, ४१ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. गाळपासाठी उसाची उपलब्धता कमी असल्याने यंदा अवघे १४६ कारखाने गाळप हंगामामधे सहभागी झाले होते. यापूर्वीच्या सलग दोन हंगामामध्ये राज्यात विक्रमी १०७ लाख टनांहून अधिक साखर उत्पादन झाले होते. यंदा मात्र ६० ते ६२ लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज आहे. कोल्हापूर विभागातील ३५ पैकी ५ कारखाने बंद झाले असून, १७०.६६ लाख टन ऊस गाळपातून २० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. पुणे विभागातील ३०पैकी ५ कारखाने बंद झाले आहेत. येथे १२९.२७ लाख टन ऊस गाळपातून १४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील २८पैकी ५ कारखाने बंद झाले असून, ६७.१९ लाख टन ऊस गाळपातून साडेसहा लाख टन साखर उत्पादित झाली आहे. अहमदनगरमधील १६ पैकी ८ कारखाने बंद झाली असून, ५४.९६ लाख टन ऊस गाळपातून साडेपाच लाख टन साखरेचे उत्पादन झाले. औरंगाबाद विभागातील १९ पैकी १२ कारखाने बंद झाले आहेत. या कारखान्यांनी ३४.९४ लाख टन उसाचे गाळप घेतले असून, सव्वातीन लाख टन साखर उत्पादित झाली. नांदेडमधील १३पैकी ४ कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, २७ लाख टन ऊस गाळपातून पावणेतीन लाख टन साखरेचे उत्पादन झाले. अमरावतीमधील दोनही कारखाने बंद झाले असून, ४ लाख टन ऊस गाळपातून ४० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. नागपूरमधील ३ कारखान्यांनी ३.८९ लाख टन ऊस गाळपातून ३० हजार टन साखर उत्पादित केली. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारagricultureशेती