बस उलटून ४0 प्रवासी जखमी

By Admin | Updated: September 10, 2015 01:51 IST2015-09-10T01:51:00+5:302015-09-10T01:51:00+5:30

खामगाव -नांदुरा मार्गावरील वळण फाट्यावर अपघात.

40 passengers injured after bus hit | बस उलटून ४0 प्रवासी जखमी

बस उलटून ४0 प्रवासी जखमी

खामगाव (जि. बुलडाणा) : समोरुन येणार्‍या कारला वाचविण्याच्या प्रयत्नात एस.टी.बस उलटली. या घटनेत ४0 जण जखमी झाले. ही घटना बुधवार ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर खामगाव -नांदुरा दरम्यान चिखली फाटा वळणावर सकाळी १0.३0 वाजताचे सुमारास घडली. खामगाव आगाराची एस.टी.बस (क्रमांक एम.एच.४0 एन. ९९४५) ही धुळ्य़ाकडून खामगावकडे येत होती. यावेळी मारुती कार (क्र. एम.एच१९ एपी १४0८) समोरील ट्रकला ओव्हरटेक करुन बससमोर आली. कारला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात ४0 जण किरकोळ जखमी झाले. जखमींवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Web Title: 40 passengers injured after bus hit