शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
2
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
4
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
5
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
6
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
7
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
8
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
9
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
10
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
11
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
12
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
13
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
14
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
15
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
16
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
17
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
18
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
19
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
20
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज : मुनगंटीवार

By अतुल कुलकर्णी | Updated: March 9, 2018 04:43 IST

राज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज असून ते २००७-०८ च्या तुलनेत कमी आहे. शिवाय, यावर्षीचे महसुली उत्पन्न २४ लाख ९६ हजार कोटी आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीची चिंता विरोधकांनी करण्याचे कारण नाही. आमचे सरकार त्यासाठी सक्षम आहे, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

- अतुल कुलकर्णीमुंबई - राज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज असून ते २००७-०८ च्या तुलनेत कमी आहे. शिवाय, यावर्षीचे महसुली उत्पन्न २४ लाख ९६ हजार कोटी आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीची चिंता विरोधकांनी करण्याचे कारण नाही. आमचे सरकार त्यासाठी सक्षम आहे, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.वित्तमंत्री मुनगंटीवार यांचा हा चौथा अर्थसंकल्प आहे. बजेटवर अंतिम हात फिरवल्यानंतर ते लोकमतशी बोलत होते. यावर्षीचा अर्थसंकल्प हा शेतकरी, उद्योग, सामाजिक न्यायाच्या विविध योजनांना न्याय देणारा आणि राज्यात रोजगार वाढविणारा असेल असेही ते म्हणाले. राज्याने ज्यादा व्याज दराने कर्ज घ्यायचे, तो पैसा विविध विभागांना त्यांच्या योजनांसाठी द्यायचा आणि त्या विभागांनी तो खर्च न करता कमी व्याज दराने पुन्हा बँकांमध्ये ठेवीच्या रुपाने ठेवतात.परिणामी राज्याचे नुकसान होते असे सांगून अर्थमंत्री म्हणाले, ही सगळी रक्कम मुख्य बजेट मध्ये आणली जाईल व जशी गरज असेल तशी ती विविध विभागांना दिली जाईल.आजपर्यंत ६० हजार कोटींची रक्कम पीएलए खात्यात निघाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यावर मोठे कर्ज आहे.व्याजासाठी किती रुपये द्यावे लागतात?राज्यावर जरी मोठे कर्ज असले आणि व्याजापोटी दरवर्षी ३० हजार कोटी रुपये द्यावे लागत असले तरी कर्जाचे हे प्रमाण उत्पनाशी सांगड घालूनच केलेले आहे.शेवटी जनतेच्या भल्यासाठी, त्यांच्या पायाभूत सोयीसाठी आणि नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी जर कर्ज काढले तर त्यात चुकीचे काहीच नाही. २००७-०८ साली कर्जाचे प्रमाण २५.५ होते जे आज १६.६ आहे. पण गेल्या २० वर्षांत जेवढ्या पुरवणी मागण्या झाल्या नाहीत, तेवढ्या या वर्षात झाल्या. नियोजनाच्या अभावातून हे झाले का?- पुरवणी मागण्या या विक्रमी होत्या हे मान्य आहे. ते तर्कसंगत वाटणारही नाही. पण गेल्यावर्षी पासून आपण प्लॅन व नॉनप्लॅन असे बजेट नीति आयोगाच्या शिफारशीमुळे एकत्र केले. त्यामुळे केंद्र आणि राज्याच्या एकत्रीत योजनांना द्यावा लागणारा राज्याचा हिस्सा त्यावेळी निश्चित झाला नव्हता. तो जसा जसा होत गेला तशा पुरवणी मागण्या कराव्या लागल्या. शिवाय कर्जमाफी, गारपीट यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करावी लागली. पण यामुळे विविध विभागांच्या निधीला ३० टक्के कट लावला गेला? ३० टक्के नाही, १० ते २०टक्के कट लावला गेला. हे आमच्याच काळात नाही तर आधीपासून हे होत आले आहे. परिस्थितीनुरुप ते करावेही लागते. पण हे करताना डीपीडीसी, आमदार निधी, कुपोषण, आरोग्य या विभागांना कट लावला नव्हता. बजेटमधून जनतेला काय मिळणार?शेतकरी, तरुण बरोेजगार आणि सामाजिक न्यायासाठीचे हा अर्थसंकल्प असेल. आपला तरुण राज्यातच नाही तर रेल्वे, बँका, मिल्ट्री या माध्यमातून देशभरात रोजगारासाठी जावा यासाठीचे वातावरण देणारा हा अर्थसंकल्प असेल.कोणत्या विभागाकडे किती डिपॉझिट ?ही आकडेवारी मोजक्या विभागांची आहे.विविध जिल्हापरिषदा 17000एमएमआरडीए 16500सिडको 8000बांधकाम बोर्ड 6000जलसंपदा 5500एमआयडीसी 5500

टॅग्स :Maharashtra Budget 2018महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८Maharashtraमहाराष्ट्रSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारDeepak Kesarkarदीपक केसरकर