बनावट डीडीद्वारे 4 कोटींची फसवणूक; एकाला अटक
By Admin | Updated: June 19, 2014 23:57 IST2014-06-19T23:57:00+5:302014-06-19T23:57:00+5:30
एचडीएफसी बँकेचा 4 कोटी रुपयांचा बनावड डीडी तयार करून इको बोर्ड इंडस्ट्रीजला देऊन बँकेची व इंडस्ट्रीची फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

बनावट डीडीद्वारे 4 कोटींची फसवणूक; एकाला अटक
पुणो : सांगली येथून जुन्या मशिनरी विकत घेण्यासाठी एचडीएफसी बँकेचा 4 कोटी रुपयांचा बनावड डीडी तयार करून इको बोर्ड इंडस्ट्रीजला देऊन बँकेची व इंडस्ट्रीची फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. शेख यांनी आरोपीला 21 जूनर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
राहुल गोपाल नवले (वय 38, रा. नाना पेठ) असे आरोपीचे नाव आहे. सुरेंद्रपाल चाननलाल शेठी (वय 59, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली. 17 जून 2क्14 रोजी इको बोर्ड इंडस्ट्रीज, कव्रे रोड येथे ही घटना घडली.
शेठी यांची जांबुळवाडी, सांगली येथे इको बोर्ड इंडस्ट्रीजची शाखा आहे. तेथून जुनी मशिनरी विकत घेण्यासाठी आरोपीने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने कल्याण येथील एचडीएफसी बँकेचा चार कोटींचा बनावट डीडी दिला व फसवणूक केली. याप्रकरणी अर्चना दिनेश रेडीज (रा. सी 3क्2, लँॅडमार्क सेक्टर, कल्याण, मुंबई) हिला अटक करायची आहे. बनावट डीडी कोठे तयार केला, बनावट डीडीसाठी बँकेचे कर्मचारी सामील आहेत का, याचा तपास करायचा आहे. यासाठी आरोपीची पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील माधव पौळ यांनी केली. (प्रतिनिधी)