शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

३,६५६ कोटींच्या पीकविम्याचे वाटप

By admin | Updated: July 29, 2016 03:31 IST

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी विम्याच्या ४ हजार २०० कोटी रुपयांपैकी ३ हजार ६५६ कोटी रुपये थेट शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची

मुंबई : गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी विम्याच्या ४ हजार २०० कोटी रुपयांपैकी ३ हजार ६५६ कोटी रुपये थेट शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत दिली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पीक विम्यासंदर्भात सूचना मांडली होती. गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या सुमारे दहा लाख शेतक-यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यापैकी सुमारे साडेसात लाख शेतकरी दुष्काळी मराठवाड्यातील आहेत. तसेच बुलडाणा जिल्ह्यातील सुमारे ११ हजार ७०० शेतक-यांना केवळ २८ रुपये एकरी विमा देण्यात आली. औरंगाबाद येथील शेतक-यांनाही कापूस आणि इतर पिकांसाठी अत्यल्प भरपाई दिली गेली. पीक विम्याचे हक्काचे पैसे न मिळाल्याने शेतक-यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाल्याचे मुंडे यांनी सभागृहात सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री खोत म्हणाले की, गेल्यावर्षी खरीप हंगामात राज्यातील ८२ लाख ५० हजार शेतक-यांनी योजनेत सहभाग नोंदवला होता. योजनेच्या निकषानुसार त्यापैकी ७१ लाख ५० हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यांना ४ हजार २०५ कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. यापैकी ३ हजार ६५६ कोटी रुपये शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत. तर एकूण ११ लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत. यात मराठवाड्यातील तीन लाख शेतक-यांचा समावेश आहे. उंबरठा उत्पन्न कमी भरल्याने या शेतक-यांना योजनेचे लाभ मिळणार नाहीत.तर, बुलडाणा येथील ३ लाख ६३ हजार शेतक-यांपैकी २ लाख ७७ हजार शेतकरी योजनेस पात्र ठरले आहेत. त्यांना १८४ कोटी ३३ लाखांची विमा रक्कम मंजूर झाल्याचे खोत यांनी सांगितले. पीक विम्याला मुदतवाढ देण्यास प्रयत्नशील - फुंडकरपंतप्रधान पीक विमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी ३१ जुलै अखेरची मुदत आहे. ही मुदत आणखी पंधरा दिवसांनी वाढवून द्यावी. इतर सहा राज्यांना केंद्र सरकारने अशी मुदतवाढ दिली असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले. यावर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, यासंदर्भात दोनवेळा केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच तसा विनंती प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे. लवकरच याबाबतची सूचना केंद्र सरकारकडून येईल.